श्री स्वामी समर्थांचे व दुधनीतील जनतेचे आशिर्वाद मोलाचे – नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे
श्री.स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांचे मनोगत
नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांचा प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट.दि.२६/१२/२५)
आपल्याला दुधनी येथील नगरपरिषद निवडणूकीत लाभलेले नगराध्यक्ष पद हे श्री स्वामी समर्थांचे व दुधनीतील जनतेचे आशिर्वादाने लाभले आहे. यामुळे श्री स्वामी समर्थांचे व दुधनीतील जनतेचे आशिर्वाद आपल्यासाठी मोलाचे असल्याचे मनोगत
दुधनी येथील शिवसेना शिंदे गटाचे नुतन नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी व्यक्त केले. प्रथमेश इंगळे यांनी नगराध्यक्ष पद लाभल्यानंतर आज प्रथमच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांनी
नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी प्रथमेश इंगळे बोलत होते. यावेळी राहुल बकरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील कटारे, वैशालीताई म्हेत्रे, रोविश मिरजे इत्यादी उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!