गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी न्यासकडून सुरू करण्यात आलेला स्वामींचा प्रसाद रुपी खुराक देण्यामध्ये अन्नछत्र मंडळ हे राज्यातचं नव्हे तर देशात एकमेव न्यास — पै.शोबराज सोमनाथ दोरकर
सामाजिक बांधिलकी जपणारे अन्नक्षेत्र

गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी न्यासकडून सुरू करण्यात आलेला स्वामींचा प्रसाद रुपी खुराक देण्यामध्ये अन्नछत्र मंडळ हे राज्यातचं नव्हे तर देशात एकमेव न्यास — पै.शोबराज सोमनाथ दोरकर
🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी न्यासकडून सुरू करण्यात आलेला स्वामींचा प्रसाद रुपी खुराक देण्यामध्ये अन्नछत्र मंडळ हे राज्यातचं नव्हे तर देशात एकमेव न्यास असल्याचे मनोगत युवा महाराष्ट्र चॅम्पियन ग्रीक रोमन्स स्पर्धेत ८७ किलो वजन गटात ब्रॉंझ पदक विजेता व अमोलराजे भोसले ग्रुपचे पै.शोबराज सोमनाथ दोरकर यांनी व्यक्त केले.*

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता, न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, सौरभ मोरे, निखील पाटील, गोटू माने, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, नामा भोसले, बाळासाहेब घाटगे, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, शरद भोसले, प्रसाद हुल्ले, रमेश हेगडे, महांतेश स्वामी, शिव स्वामी, एस.के. स्वामी, सिद्धाराम कल्याणी, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, विशाल घाटगे, तानाजी पाटील, अनिल बिराजदार, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, विठ्ठल रेड्डी यांच्या सह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
