चलो रायगड… चलो रायगड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अक्कलकोट येथून मोफत रायगड दर्शन सोहळा

अक्कलकोट दि.29 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दि.6 जून 2023 रोजीच्या ऐतिहासिक 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समिती यांच्यावतीने मोफत रायगड मोहिम आयोजित करण्यात आल्याची माहिती आतिश पवार यांनी दिली आहे.
समितीचे आधरस्तंभ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सदरच्या मोहिमेचे आयोजन करण्यात आली असून शिवभक्तांनी जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन अंकुश चौगुले यांनी केले आहे. याकरिता योगेश पवार 8208065494 अंकुश चौगुले 9960662424, बालाजी पाटील 8087002895, अशोक जाधव 9921142671, प्रसाद मोरे 7507897655, विशाल घाटगे 9607799386, राजाराम पवार 8975566547, लक्ष्मण शिंदे 93598559308, भरत राजेगावकर 9527595261, अभिषेक चव्हाण 8605514727, अजय शिंदे 8010327449, गणेश पाटील 9545116143, शुभम सुरवसे 7410518258 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन योगेश पवार यांनी केले आहे.
