श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमुळे अक्कलकोटचे नाव जागतिक पातळीवर – आ.बी.आर. पाटील
आमदार बी.आर.पाटील यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमुळे अक्कलकोटचे नाव जागतिक पातळीवर – आ.बी.आर. पाटील

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.८/२/२४) – श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेले श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे अनेक स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे, त्यामुळे देशातील अनेक स्वामी भक्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देत आहेत. सर्व स्वामी भक्तांची दर्शन व्यवस्था येथे उत्तम प्रकारे राबविली जाते. या माध्यमातून स्वामी नामाची कीर्ती देशासह जगभरात विस्तारित होत आहे. आलेल्या सर्व स्वामी भक्तांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी उत्तम दर्शन व्यवस्थेचे मापदंड आखून दिलेले आहे. त्यानुसार मंदिर समितीचे सेवेकरी सर्व स्वामी भक्तांची दर्शन व्यवस्था उत्कृष्टपणे सांभाळत आहेत, म्हणून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून अक्कलकोटचे नाव जागतिक पातळीवर दृष्टीक्षेपात आले असल्याचे मनोगत
कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सल्लागार व आळंद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बी.आर.पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आ.पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी आमदार पाटील बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, प्रसाद सोनार, विपुल जाधव, सागर गोंडाळ, स्वामीनाथ लोणारी, श्रीकांत मलवे, आदींसह भावीक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – आमदार बी.आर.पाटील यांचा श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
