गावगाथा

*तोळणूर येथील श्री सिद्धेश्वर यात्रा उत्साहात संपन्न*

शोभेचे दारू काम उपस्थितांचे डोळ्याचे पारणे फेडणारे होते कुस्त्या व शोभेचे दारूकाम पाहण्यासाठी विविध गावातून लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*तोळणूर येथील श्री सिद्धेश्वर यात्रा उत्साहात संपन्न*


*अक्कलकोट :-*
तालुक्यातील महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर वसलेले तोळणूर येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमाने कप्पळ कळी यात्रा विसर्जनाचे मोठ्या भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाले.


सोलापूर येथील श्री.सिद्धेश्वर यात्रा म्हणजे मिनी सिद्धेश्वर यात्रा म्हणून तोळणूर येथील श्री.सिद्धेश्वर यात्रा प्रसिद्ध आहे.दरवर्षी मोठ्या विधी विधानाने विविध धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक कार्यक्रमाने मोठ्या भक्तिभावाने सर्वधर्मीय लोक यात्रा साजरे केले जातात. दि.१३ जानेवारी पासून मल्लिकार्जुन मंदिर येथे तैलाभिषेकाने सुरुवात झालेली यात्रा रविवार 14जानेवारी रोजी गावातील प्रमुख मार्गावरून नंदिध्वज मिरवणूक संमत वाचन आणि रात्री अक्षता कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले.सोमवार दि.15 जानेवारी रोजी पहाटे श्री.मल्लिकार्जुन आणि श्री सिद्धेश्वर मूर्तीस महारुद्रभिषेक सायंकाळी मानाचे नंदिद्वज सुशोभित करून मिरवणुकीने मंदिर परिसरात आगमन आणि होम कट्यावर होम कार्यक्रम असंख्य भक्तांच्या उपस्थिती मध्ये विधी विधानाने पार पडले.मंगळवार दि.16जानेवरी रोजी संध्याकाळी 5 वाजता प्रसिद्ध मल्लांचे जंगी कुस्त्या पार पडले.कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध मल्ल सहभागी झाले होते रात्री 10 वाजता शोभेचे दारू काम उपस्थितांचे डोळ्याचे पारणे फेडणारे होते कुस्त्या व शोभेचे दारूकाम पाहण्यासाठी विविध गावातून लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वरील यात्रा काळात बैल गाडी शर्यत,रांगोळी स्पर्धा,भक्तांना अन्न दासोह,रक्तदान शिबिर,गी गी पदांचे कलगीतुरा कार्यक्रम तसेच मनोरंजन करणारे समजिक नाटक असे विविध कार्यक्रमातून या वर्षीचे श्री.सिद्धेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात कप्पळ कळीने यात्रेची सांगता झाली .
यात्रा यशस्वी होण्यासाठी मंदिर पंच कमिटीच्या चेअरमन प्रकाश उणणद ,रमेश उप्पीन,मल्लिनाथ वाले,बसवराज उणणद चनबसय्या कौटगी,कल्याणी रब्बा,राजशेखर पाटील, संगमेश पाटील, श्रीशैल रब्बा, लक्ष्मीपुत्र कुसगल,बाबुराव गुड्डेवाडी,शिवशरण कुसगल,सिद्धाप्पा रब्बा,विश्वनाथ करजगी, तसेच सर्व सदस्य आणि समस्त तोळणूर ग्रामस्थांनी आणि सद्भक्तानी परिश्रम घेतले.
फोटो ओळ –

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button