नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांचा शरण संकुल तर्फे सत्कार.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांचा शरण संकुल तर्फे सत्कार.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230609-WA0045-763x470.jpg)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांचा शरण संकुल तर्फे सत्कार.
नवी मुंबई: ‘माझी वसुंधरा अभियान- (2022/23) अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे, त्याप्रित्यर्थ महाराष्ट्र शासनाने नुकतेच नवी मुंबई महानगरपालिकेचा मा. मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या आनंदाच्या क्षणी आज दिनांक 8/6/2023 रोजी *’शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी’ तर्फे नमुंमपा चे सन्माननीय *आयुक्त श्री राजेश नार्वेकर साहेब* यांचा विशेष सत्कार करण्यात आला. महात्मा बसवेश्वरांची मुर्ती, विभूती, शाल व विशेष अभिनंदन पत्र देऊन मा.आयुक्त साहेबांचा सत्कार करण्यात आला. नवी मुंबईतील सर्व नागरिकांच्या सहकार्यामूळेच पालिकेला हा पुरस्कार मिळविणे शक्य झाल्याचे मा.आयुक्त साहेबांनी यावेळी आवर्जून सांगितले. शरण संकुल व समस्त वीरशैव-लिंगायत समाजाचे आयुक्त साहेबांनी विनम्रतेने आभार व्यक्त केले व शहर स्वच्छ आणि सदृढ ठेवण्यासाठी सर्वांनी आपापल्या जबाबदारीचे पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी, जी.बी.रामलिंगय्या, एच्.जगदिशप्पा, सुनील पाटील, वैजनाथ आग्रे, प्रकाश अवरनळ्ळी, चंद्रशेखर नंदीकोल स्वामी, सिध्दूशेठ इटकर, मुधोळकर, योगिता गोरे व आनंद गवी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)