प्रथमेश इंगळेंचा हसापूर ग्रामस्थांच्या वतीने सन्मान
उच्च माध्यमिक शिक्षणात आय.एम.एस. मध्ये द्वितीय क्रमांक मिळविल्या बद्दल झाला सन्मान.
प्रथमेश इंगळेंचा हसापूर ग्रामस्थांच्या वतीने सन्मान
उच्च माध्यमिक शिक्षणात आय.एम.एस. मध्ये द्वितीय क्रमांक मिळविल्या बद्दल झाला सन्मान.
(प्रतिनिधी अक्कलकोट,
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष व नगरसेवक तथा शहरातील प्रतिष्ठित नागरिक महेश इंगळे यांचे चिरंजीव प्रथमेश इंगळे यांनी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षेत येथील इंडियन मॉडेल स्कूल मधून विज्ञान शाखेतून द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादन केल्याबद्दल महेश इंगळे मित्रपरिवार व हसापूर ग्रामस्थांच्या वतीने प्रथमेश इंगळे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
महेशजी इंगळे मित्र परिवार हसापूर, परमेश्वर कामठी, गौतम घाटकांबळे, राजकुमार कामठी, महेश्वर स्वामी, मधुकर सदाफुले, अभय जाधव, अभिषेक कामठी, सैपन सहाय्यक, रोहित जाधव, रोहित चव्हाण, युनूस शेख, बाबा नायकवडी यांनी
हा सन्मान केला.याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, ऋषिकेश लोणारी, महेश मस्कले इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – महेश इंगळे मित्रपरिवार व हसापूर ग्रामस्थांच्या वतीने प्रथमेश इंगळेचा सत्कार संपन्न होतानाचे प्रसंग.