हुदा सोशल फाउंडशनच्या पटेल दाम्पत्य यांना सामाजिक पुरस्कार प्रदान…

हुदा सोशल फाउंडशनच्या पटेल दाम्पत्य यांना सामाजिक पुरस्कार प्रदान…

सोलापूर — येथील सैपन इनामदार यांनी आयोजित केलेल्या फेस ऑफ इंडिया इंडियाज बिघेस्ट ब्युटी पेजंट या कार्यक्रमात हुदा सोशल फाउंडशनच्या संस्थापिका हीना पटेल आणि अध्यक्ष साहिल पटेल यांचा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल “सामाजिक” पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून हुदा सोशल फाउंडेशन माध्यमातून गरजू लोकांना जेवण आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी काम करत आहे. शैक्षणिक महिला सबलीकरण महिलांच्या प्रश्नाबाबत हुदा सोशल फाउंडशन काम करत आहे.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक सैपन इनामदार उपस्थित होते.प्रसिध्द भारतामध्ये गोल्डन गाईज या नावाने ओळखले जाणारे सनी वाघचौरे आणि संजय गुज्जर यांच्या हस्ते पटेल दाम्पत्य सत्कार करण्यात आला.
