पालखी महोत्सव

वारकऱ्यांची मालिश करण्यासाठी रज्जाक चाचांची ‘हैदराबाद टू पुणे वारी’; 18 वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेत

वारकऱ्यांची मालिश करण्यासाठी रज्जाक चाचांची 'हैदराबाद टू पुणे वारी'; 18 वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेत

वारकऱ्यांची मालिश करण्यासाठी रज्जाक चाचांची ‘हैदराबाद टू पुणे वारी’; 18 वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेत

HTML img Tag Simply Easy Learning    

Ashadhi Ekadashi 2023 : मागील शेकडो वर्षांपासून महाराष्ट्राला वारीची परंपरा आहे. याच वारीत जात, धर्म सोडून अनेक नागरिक फक्त वारकऱ्यांची सेवा करतात. त्यांना हवं नको ते पाहतात. या वारीत जसं भक्ती रसाचं, श्रद्धेचं दर्शन होतं त्याच प्रमाणे सर्व धर्म समभावाचंदेखील दर्शन होतं. वारीत वारकऱ्यांची सेवा करण्य़ासाठी पुणेकर सज्ज असतात. मात्र त्यांच्यासोबतच इतर गावातील लोकही आपल्या कुवतीप्रमाणे मदत करत असतात. याच वारीत हिंदू मुस्लिम सलोख्याचं दर्शन घडतं. एक मुस्लिम चाचा वारकऱ्यांचा थकवा घालवण्यासाठी आणि त्यांची मालिश करण्यासाठी 18 वर्षांपासून खास वारीसाठी हैद्राबात ते पुणे प्रवास करतात. वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा करणं होय, असं ते सांगतात.
वारकऱ्यांचा थकवा घालवण्यासाठी आणि त्यांची मालिश करण्यासाठी येणाऱ्या मुस्लिम व्यक्तीचं नाव रज्जाक चाचा आहे. ते मागील 18 वर्षांपासून वारीत सेवा देतात. वारकऱ्यांना मालिश करायची आणि त्यांच्यामार्फत विठुरायाची सेवा करायची म्हणून ते दरवर्षी वारीचे दोन दिवस थेट हैदराबादहून पुण्यात येतात. ते मुळचे हैदराबादचे आहेत. मात्र काही वर्ष पुण्यात त्यांच्या मुलीकडे राहायला होते. ते खास जडीबुटी वापरुन आयुर्वेदीक तेल बनवतात. ते तेल अनेक दुखण्यांवर कामी येतं. तेच तेल वापरुन त्यांनी आतापर्यंत अनेकांचं दुखणं घालवलं आहे. त्यामुळे वारीतदेखील तेच तेल वापरुन चाचा वारकऱ्यांच्या हातापायाची मालिश करतात आणि त्यांचा ताण घालवतात पालखी सोहळ्याच्या निमित्ताने अनेक लाखो भाविक श्रद्धेने पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात. यामुळे गेली अनेक वर्षे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा अधिक वैभवशाली ठरली आहे. समानतेचा आणि एकतेचा संदेश देणारी वारी ही सामाजिक स्वास्थ्य घडवणारी अनोखी शक्ती आहे. त्यामुळे वारकऱ्यांची सेवा हिच विठुरायाची सेवा म्हणत नागरिक वारकऱ्यांची सेवा करताना दिसतात.

HTML img Tag Simply Easy Learning    

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button