महातपस्वी लिंगैक्य श्री. गुड्ड्द बसवराज महास्वामीजी यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी श्रींच्या पालखी मिरवणुकीने व विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न
पालखी मिरवणुकीत पंचक्रोशीतून आलेली भजनामंडळे, बँड पथक व लेझीम पथक सहभागी झालेले होते,

करजगी दि.2 मागील दहा दिवसापासून विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमानी साजरा होत असलेल्या करजगी येथील महातपस्वी लिंगैक्य श्री. गुड्ड्द बसवराज महास्वामीजी यांच्या ५८ व्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता सोमवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी श्रींच्या पालखी मिरवणुकीने व विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाले.

प्रातःकाळी श्रींच्या समाधीस महारुद्राभिषेक करण्यात आले तर सकाळी सात ते अकरा च्या दरम्यान श्री. शिवानंद महास्वामीजी, करजगी, श्री. अभिनव महास्वामीजी नोणविनकेरे, श्री.षडभावरहीतेश्वर महास्वामीजी, हेगडळी, श्री गुरुलिंग महास्वामीजी, यलगोड श्री बसवराज शास्त्री, तीर्थ यांच्या सानिध्यात सहस्त्र सुहासिनी पुजा, महामृत्युंजय यज्ञ व विविध धार्मिक उपक्रम संपन्न झाले.
दुपारी एक वाजता श्रींच्या पालखीची गावातून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली, पालखी मिरवणुकीच्या स्वागतासाठी गावातील विविध गणेश मंडळ, युवा मंडळ, व सामाजिक संस्थांकडून स्वागत कमानी, रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आलेल्या होत्या.
पालखी मिरवणुकीत पंचक्रोशीतून आलेली भजनामंडळे, बँड पथक व लेझीम पथक सहभागी झालेले होते, संध्याकाळी संपन्न झालेल्या धर्मसभेत विविध महास्वामीजींच्या सानिध्यात श्री सिद्धारूढ चरितामृत पुराणाच्या समाप्तीने महोत्सवाची सांगता करण्यात आली.
