महेश इंगळेंच्या हातून होणारी स्वामी सेवा वंदनीय – कांचन गडकरी
कांचन गडकरी व सहकाऱ्यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, आ.सचिन कल्याणशेट्टी, अमोलराजे भोसले व अन्य दिसत आहेत.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230613-WA0043-719x470.jpg)
महेश इंगळेंच्या हातून होणारी स्वामी सेवा वंदनीय – कांचन गडकरी
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१३/६/२३) – सेवा, सहकार, भक्ती, धर्म या चौसूत्रींचा सार अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आहे. मी ही व गडकरी कुटूंबीय निस्सीम स्वामीभक्त असल्याने या चौसूत्रींचा अवलंब करत स्वामी भक्ती करीत असते. त्यामुळे स्वामीभक्तीतून जीवनात होणारी फलप्राप्ती हे खूपच फलदायी आहे. त्या माध्यमातून होणारी फलप्राप्ती जीवनाला व जीवनातील स्वामी भक्तीला पूरक आहे. हा सर्व सार मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या जीवनालाही लाभलेला आहे.
कारण ते श्री स्वामी समर्थांच्या मूळ स्थानी म्हणजेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात अविरतपणे सेवा देत आहेत. म्हणून महेश इंगळेंच्या हातून होणारी स्वामी सेवा वंदनीय असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्या सुविद्य पत्नी सौ.कांचन गडकरी यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व आ.सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी कांचन गडकरी व त्यांच्या समवेत असलेले मधुरा गडकरी, प्रदीप खुपसे, अनिल विपत यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी गडकरी बोलत होत्या. पुढे बोलताना गडकरी यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व स्वामी भक्तांचा विस्तार भविष्यात वाढतच राहणार आहे. त्यामुळे मंदिर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांना मोठ्या प्रमाणात स्वामी समर्थांच्या सेवेच्या माध्यमातून भाविकांची सेवा करता येणार आहे. ही त्यांच्याकरिता खूपच समाधानकारक व स्वामी सेवेचे फलदायी समाधान देणारी बाब ठरणार आहे. त्याकरिता त्यांनी पुढील जीवनाच्या काळात नेहमी सजग राहावे असेही आव्हानात्मक मनोगत गडकरी यांनी व्यक्त करून मंदिर समितीच्या व महेश इंगळे यांच्या कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी नगरसेवक महेश हिंडोळे, उत्तम गायकवाड, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, गिरीश पवार, विपूल जाधव, श्रीकांत मलवे आदीसह स्वामीभक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – कांचन गडकरी व सहकाऱ्यांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे, आ.सचिन कल्याणशेट्टी, अमोलराजे भोसले व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)