नेत्रहीन बांधवांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा भक्त निवास मध्ये संपन्न
नेत्रहीन बांधवांच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील पारितोषिक वितरण प्रसंगी आत्माराम घाटगे, संजय घोडेराव, पंकज बेंद्रे, प्रवीण राठी, सायली शितोळे व अन्य दिसत आहेत.

नेत्रहीन बांधवांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा भक्त निवास मध्ये संपन्न

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१९/६/२३) –
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर द विजूअली चॅलेंज यांच्या संयुक्त विद्यमाने
नेत्रहीन बांधवांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा देवस्थानच्या भक्तनिवास येथे संपन्न झाली.ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंड यांच्या नेतृत्वाखाली मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली ही स्पर्धा पार पडली. दिनांक १६ जून ते १८ जून या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध भागातून एकूण ९१ स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस सातारा जिल्ह्याचे चेस मास्टर अतुल काकडे तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस ठाण्याचे मदन बागायतकर व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मुंबईचे महेश मापदी यांनी पटकावले.
या स्पर्धेतून प्रथम पंधरा स्पर्धकांची व दहा कनिष्ठ स्पर्धकांची आणि पाच महिला स्पर्धकांची गोवा येथे दिनांक ३ ते ६ ऑगस्ट २०२३ रोजी होणाऱ्या पश्चिम विभागीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव आत्माराम घाटगे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी मंचावर ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर द ब्लाइंडचे पश्चिम विभागीय उपाध्यक्ष माननीय मदन बागायतकर, ऑल मराठी चेस असोसिएशन फॉर द विजूअली चॅलेंजचे अध्यक्ष मा.संजय घोडेराव महासचिव पंकज बेंद्रे जिल्हा संयोजक प्रवीण राठी व कु. सायली शितोळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ओळ – नेत्रहीन बांधवांच्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेतील पारितोषिक वितरण प्रसंगी आत्माराम घाटगे, संजय घोडेराव, पंकज बेंद्रे, प्रवीण राठी, सायली शितोळे व अन्य दिसत आहेत.
