वागदरी येथे मतदार जनजागृती मोहीम विद्यार्थ्यांचे पथनाट्य लक्ष वेधून घेतले
मतदार जागृती अभियान

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी ग्रामपंचायत समोर जि.प. कन्नड शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदार जन जागृती अभियानाचा एक भाग म्हणून पथनाट्य सदर केले. गट शिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे, केंद्रप्रमुख बापूराव चव्हाण, वागदरी सरपंच श्रीकांत भैरामडगी, उपसरपंच पंकज सुतार अहंमद पटेल, शिवानंद गोगाव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

वागदरी येथे मतदार जनजागृती मोहीम
विद्यार्थ्यांचे पथनाट्य लक्ष वेधून घेतले
अक्कलकोट
मतदार जागृती अभियानांतर्गत तालुक्यातील वागदरी येथील ग्राम पंचायत समोर वागदरी कन्नड प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांकडून सादर केलेल्या पथनाट्य मार्फत मतदार जन जागृतीचा अभियानाच्या शुभारंभ करण्यात आला.
गुरुवारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत अरबाळे यांनी मोहिमेचा शुभारंभ करून, तालुक्यात निवडणूक अधिकारी व तहसिलदार साहेबांच्या आदेशानुसार गावोगावी मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. आज कन्नड शाळेतील मुलांनी सादर केलेल्या पथनाट्य कौतुकास्पद आहे. मुलाकडून जन जागृती होण्यास मदत होयील तहसीलदार आदेशानुसार तालुक्याच्या इतर काही भागात मुलांना मतदार जागृती करण्याची संधी देण्यात येइल.
मुलांनी आपापल्या शैलीत गावात पथनाट्या द्वारे मतदाराना शंभर टक्के मतदान देखावे साकारून मतदारांमध्ये जनजागृती केली आणि प्रत्येकाने मतदान सक्तीचे करावे, या संदेशाकडे लक्ष वेधले. जमावाने टाळ्या वाजवून कौतुक केले.
ग्रा.पं.च्या सरपंच श्रीकांत भैरामडगी, उपसरपंच पंकज सुतार, ग्राम पंचायत सदस्य हनिफ मुल्ला, शिवानंद घोळसगाव, केंद्रप्रमुख बापुराव चव्हाण, शिक्षक महंमद पटेल, शिवानंद गोगाव, सिद्धराम होदलुरे, कन्नड शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष बसवराज उमराणी, मल्लीनाथ मंगाणे, भीमाशंकर सुतारा , मल्लिनाथ सुरवसे , सिद्धराम कोटे , मामल्ला दुरगे , श्रीशैल वड्डर आदींसह वागदरी कन्नड शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
