नगरसेवक महेश इंगळे यांच्या निवडणुक
विजयामुळे कट्टर समर्थक बंटी
नारायणकर यांनी केस कापून फेडले नवस.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२७/१२/२५)
नुकतेच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत अक्कलकोट शहर प्रभाग क्रमांक ११ ब मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे हे सलग पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून विजयी झाले आहेत. त्यांच्या या ऐतिहासिक विजयासाठी महेश मालक इंगळे यांचे कट्टर समर्थक व डोंबरजवळगे येथील रहिवाशी तथा कै. कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे कर्मचारी बंटी नारायणकर यांनी आपल्या डोक्यावरील संपूर्ण केस कापण्याचा नवस बोलला होता. त्या अनुशंगाने महेश मालक इंगळे यांच्या विजयानंतर बंटी नारायणकर यांनी आपल्या डोक्यावरील केस कापून बोललेला नवस फेडला आहे. यावेळी बोलताना महेश मालक इंगळे यांचे कट्टर समर्थक बंटी नारायणकर यांनी अक्कलकोट स्वामी समर्थांच्या कृपाछायेत सदैव न्हाऊन निघालेले व प्रामाणिकपणाचा झेंडा खांद्यावर घेतलेले आणि सेवाभावालाच आपले खरे वैभव मानणारे माननीय महेश इंगळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन आत्ता पार पडलेल्या निवडणुकीत बहुमोल मताधिक्याने मिळालेला विजय हा केवळ राजकीय यश नसून, जनतेच्या विश्वासाचा आणि स्वामीभक्तीच्या तपश्चर्येचा साक्षात्कार आहे. श्री स्वामी समर्थांची सेवा २४ तास अखंडपणे करणारा हा सच्चा कार्यकर्ता, स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन कार्यरत असतो; म्हणूनच स्वामींची कृपा त्यांच्या पाठीशी उभी आहे, हेच त्यांच्या यशातून प्रकर्षाने जाणवते. सलग पाच वेळा निवडून येण्याचा मान हा त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाची, कार्यतत्परतेची आणि दांडग्या स्वामीभक्तीची जिवंत साक्ष आहे. स्वामी समर्थांची कृपा अशीच त्यांच्या जीवनपथावर वर्षत राहो.
येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची, येणाऱ्या स्वामी भक्तांची व तालुक्यातील जनतेची सेवा त्यांच्या हातून जास्तीत जास्त घडो आणि जनतेचा विश्वास हा सदैव त्यांच्या पाठीशी दृढ राहो
हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो असे मनोगत व्यक्त केले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!