गावगाथा

माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने पत्रकार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृह फार्मसी कॉलेजच्या वतीने पत्रकार व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी बापूराव पाटील, धनराज मंगरुळे, गोविंद पाटील, दत्ता चटगे, डॉ. श्रीराम पेठकर, डॉ. अशोक सपाटे, डॉ. सतिश शेळके व अन्य.

माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने पत्रकार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मुरूम, ता. उमरगा, ता. ६ (प्रतिनिधी) : येथील नगर शिक्षण विकास मंडळ संचलित माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पत्रकार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ गुरुवारी (ता. ६) रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील होते. यावेळी श्रमजीवी कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. श्रीराम पेठकर, श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, उमरगा पंचायत समितीचे माजी उपसभापती गोविंद पाटील, विकासेसोचे चेअरमन दत्ता चटगे, प्रा. डॉ. सतिश शेळके, मुरुम पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास वाडीकर, प्रा. दिपाली स्वामी, समन्वयक प्रा. डॉ. रवी आळंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कै. माधवराव (काका) पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पत्रकार राजेंद्र कारभारी, महेश निंबरगे, राजेंद्र घोडके, रामलिंग पुराणे, अजिंक्य कांबळे, नहीरपाशा मासुलदार, हुसेन नुरसे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. सुभाष हुलपल्ले, योगेश पांचाळ, डॉ. महेश मोटे आदींसह डी. फार्मसीमध्ये गुणानुक्रमे विशेष प्राविण्य मिळविलेल्या कु. प्रतीक्षा गायकवाड, पूजा ख्याडे, दीक्षा डावरे यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू शाल, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सुशील मठपती यांच्या रसायनशास्त्र अभ्यासक्रमावरील ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य श्रीराम पेठकर, डॉ. अशोक सपाटे, डॉ. महेश मोटे, प्रतिक्षा गायकवाड यांना मनोगत व्यक्त केले. प्रा. लखन पवार, प्रा. योगेश पाटील, प्रा. सुदिप ढंगे, प्रा. राजनंदिनी लिमये, अमोल कटके, किशोर कारभारी, चंद्रकांत पुजारी, प्रभाकर महिंद्रकर, शंभूराजे काजळे, अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रवींद्र आळंगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. प्रियंका काजळे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी व कर्मचारी वृद्ध उपस्थित होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृह फार्मसी कॉलेजच्या वतीने पत्रकार व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराप्रसंगी बापूराव पाटील, धनराज मंगरुळे, गोविंद पाटील, दत्ता चटगे, डॉ. श्रीराम पेठकर, डॉ. अशोक सपाटे, डॉ. सतिश शेळके व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button