स्वामी दर्शनाचा योग लाभणे खूप मोठे भाग्य – आनंद हुगार
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.६/७/२३) –
श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणे हे जीवनाचे परम भाग्य तर आहेच, परंतु ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत व त्यांचे निवास असलेले वटवृक्ष मंदिर परिसराच्या पदस्पर्शाने जीवन धन्य झाले. त्यामुळे स्वामी दर्शनाचा योग लाभणे म्हणजे आमचे खूप मोठे भाग्य असल्याचे मनोगत कर्नाटकच्या विजयपूर येथील ज्युनियर रविचंद्रन आनंद हुगार यांनी व्यक्त केले. ते नुकतेच आपले सहकारी ज्युनिअर विष्णुवर्धन रवि कोरी यांच्यासमवेत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी हुगार बोलत होते. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रकाश महिंद्रकर, निलेश अथणी, सोमनाथ मोटगी, आनंद बेळगाव, राजू विजयनगर, रुद्रय्या स्वामी, श्रीकांत मलवे इत्यादी उपस्थित होते.
फोटो ओळ – आनंद हुगार, रवी कोरी यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
More Stories
Akkalkot : अक्कलकोटकरांची सांज ठरली अविस्मरणीय ; लोकगीत कधीच संपणार नाही, विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानमालेत निर्माते स्वप्नील रास्ते यांचे मनोगत
Akkalkot: स्वामींच्या वास्तव्यामुळे वटवृक्ष मंदीराचा धार्मिक पर्यटन स्थान म्हणून उदय – आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे
Akkalkot: नाताळच्या सुट्टीमुळे अन्नछत्रात झालेल्या गर्दीचा न्यासाकडून योग्य नियोजन ; स्वामीभक्तांनी व्यक्त केल्या भावना