वटवृक्ष मंदिरातील सत्कार म्हणजे स्वामींचे प्रसादिक स्वरूप – आ.आशिष शेलार
आ.आशिष शेलार यांचा सत्कार करताना महेश इंगळे, आ.सचिन कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230711-WA0009-780x470.jpg)
वटवृक्ष मंदिरातील सत्कार म्हणजे स्वामींचे प्रसादिक स्वरूप – आ.आशिष शेलार
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.११/७/२३) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात अनेक मान्यवर भेटी देऊन स्वामींचे दर्शन घेत असतात. यानंतर मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी त्यांना स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मानित करीत असतात. त्याप्रमाणे आमचाही त्यांनी सन्मान केला असल्याने या सन्मानाच्या माध्यमातून वटवृक्ष मंदीरात झालेला सत्कार म्हणजे मंदिरातील स्वामींचे प्रासादीक स्वरूप असल्याचे मनोगत भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष व माजी मंत्री, आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केले.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी आ.आशिष शेलार यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदार महाराज पुजारी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, शहाजी पवार, मोहन डांगरे, मोतीराम राठोड, अविनाश मडीखांबे, प्रथमेश इंगळे, लखन झंपले, नन्नु कोरबू, शेखर गुंजले, धनंजय गाढवे, नागेश कलशेट्टी, स्वामी भक्त नरेंद्र हेटे, अमेय हेटे, मंजिरी हेटे कुटूंबीय, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, गिरीश पवार, रवी मलवे, सागर गोंडाळ, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, संतोष जमगे, श्रीशैल गवंडी,काशिनाथ सोलनकर इत्यादी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – आ.आशिष शेलार यांचा सत्कार करताना महेश इंगळे, आ.सचिन कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)