श्री रेवणसिद्धेश्वर सार्वजनिक वाचनालय चपळगाववाडी येथे वाचक दिन साजरा
श्री रेवणसिद्धेश्वर सार्वजनिक वाचनालय चपळगाववाडी येथे वाचक दिन साजरा

श्री रेवणसिद्धेश्वर सार्वजनिक वाचनालय चपळगाववाडी येथे वाचक दिन साजरा


श्री रेवणसिद्धेश्वर सार्वजनिक वाचनालय चपळगाववाडी व जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा चपळगाववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वाचक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी ग्रंथपाल गौरीशंकर दोड्याळे यांनी वाचक दिनाचे महत्त्व समजावून सांगताना विद्यार्थ्यांनी नियमित वर्तमानपत्रे व मासिके वाचावेत. यासाठी ग्रंथालयाकडून शाळेसाठी नियमित दै लोकमत हे वर्तमान पत्र सुरू केले आहे. त्याचप्रमाणे ग्रंथालयाकडून सहा हजार किमतीचे पाढे, मुळाक्षरे (मराठी व इंग्रजी) असे ९ डिजिटल बोर्ड दिले आहे. सहशिक्षक श्री तुकाराम जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून सांगितले व या काळात वाचनाची किती गरज आहे हे विद्यार्थ्यांना समजून सांगितले याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री गोविंदे सर, गुरशांत गोविंद, पंडित परशेट्टी सर, इलाई नदाफ, जावेद नदाफ, यासीन नदाफ हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री तुकाराम जाधव सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल गौरीशंकर दोड्याळे व्यक्त केले.

