गावगाथा

माहेश्वरी मंडळाकडून मुरूम येथे भागवत कथेचे आयोजन भागवत कथेची भव्य शोभायात्रेने सुरुवात

भागवत कथेची भव्य शोभायात्रे प्रसंगी राधाकृष्ण डागा, शामसुंदर मिणियार, अशोक मिणियार व अन्य.

माहेश्वरी मंडळाकडून मुरूम येथे भागवत कथेचे आयोजन
भागवत कथेची भव्य शोभायात्रेने सुरुवात
मुरूम, ता.२६ (प्रतिनिधी) :
अधिकमास निमित्त मुरूम शहरातील माहेश्वरी मंडळाकडून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करून या कथेच्या सोहळ्याची सुरुवात बुधवारी (ता. २६) रोजी भव्य शोभायात्रेने करण्यात आली.
मुरूम येथे माहेश्वरी मंडळाकडून गेल्या अनेक वर्षापासून अधिकमासात भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षी अधिकमास सुरू झाल्याचे औचित्य साधून डॉ. राधाकृष्ण डागा यांच्या याजमानाखाली व डॉ. शिवप्रसाद काबरा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ( ता.२६) रोजी पासून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ डोळ्याची सुरुवात शामसुंदर मिनियार यांच्या निवासस्थानापासून माहेश्वरी भवन येथे भव्य शोभायात्रेने करण्यात आली. माहेश्वरी भवन येथे २६ ते १ ऑगस्ट दरम्यान दुपारी दोन ते सायंकाळी सहा पर्यंत ते ढोकी येथील हभप पद्मनाभ व्यास महाराज आपल्या अमृतवाणीने गोकर्ण कथा, कपिल अवतार, नृसिंह अवतार, भक्त प्रल्हाद चरित्र कथा सांगणार आहेत.
शनिवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव तर सोमवारी श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह हुबेहूब साकारण्यात येणार आहे. मंगळवारी (ता.१) रोजी सुदामा कथा समाप्ती होणार असून यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. शहर व परिसरातील भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आव्हान माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष गणेश मिणियार, सचिव डॉ. सागर काबरा उपाध्यक्ष पवन मिनियार यांनी केले आहे. शोभायात्रेत युवक, महिलासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथे भागवत कथेची भव्य शोभायात्रे प्रसंगी राधाकृष्ण डागा, शामसुंदर मिणियार, अशोक मिणियार व अन्य.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button