ग्रामीण घडामोडी

*”जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्काराची गरज” … विश्वाराध्य मळेंद्र महास्वामीजी* शिवगणेश मंदिर महाद्वाराचे उद्घाटन

प्राचार्य सुधीर सोनकवडे यांनी मानले. यावेळी शिवराज बिराजदार, रामलिंग उदंडे, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*”जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्काराची गरज” … विश्वाराध्य मळेंद्र महास्वामीजी*
शिवगणेश मंदिर महाद्वाराचे उद्घाटन
श्रीक्षेत्र तीर्थ. (ता. द. सोलापूर )दि.२६.
श्री रामलिंगेश्वर शिक्षण संकुल येथे शिव-गणेश मंदिर महाद्वाराचे उद्घाटन व द्वारपूजन ष.ब्र.विश्वाराध्य मळेंद्र महास्वामीजीच्या शुभहस्ते व
वेदमूर्ती बसवराज शास्त्री , संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार, प्राचार्य सुधीर सोनकवडे, कॉन्ट्रॅक्टर कलप्पा म्हेत्रे,आदींच्या उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी महास्वामीजी आपल्या आशीर्वचनात मार्गदर्शन करताना जीवन हे शाश्वत नसून जीवन जगताना, नीतिमत्तेने जगले पाहिजे. मानव नैतिकता गमावत असल्याने गीता, बायबल, कुराण या सारख्या ग्रंथांची आवश्यकता आहे. ते प्राणीमात्रांना नाही कारण ते नैतिकता गमावले नाहीत. मानवाजवळ चांगले विचार चांगली भावना असावी.विद्यार्थ्यांनी आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून घ्येय साध्य करावे हुशार होण्याअगोदर संस्कारीत होणे काळाजी गरज आहे . जन्म मरण देवाच्या हाती आहे. जन्म व मरण यातील जीवन कसं जगायच हे आपल्या जगण्यावर अवलंबून आहे. श्री शिवयोगी सिद्धारामेश्वर महाराज हे प्रा डॉ.बिराजदार यांचे श्वास आहेत. हे त्यांच्या आचरणातून व्यक्त होते .असे मननीय विचार यावेळी मांडले.
याप्रसंगी प्रा.डॉ. बिराजदार सर आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,संकल्पा शिवाय आयुष्याला दिशा नाही संकल्प पूर्तीसाठी ध्येयवेडा होवून काम केले पाहिजे तेव्हा कार्य पूर्णत्वास येते असे मत व्यक्त केले यावेळी मंदिर बांधकाम सर्व कारागिरांची महास्वामीजींच्या हस्ते शाल व श्री फळ देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पट्टणशेट्टी तर आभार प्राचार्य सुधीर सोनकवडे यांनी मानले. यावेळी शिवराज बिराजदार, रामलिंग उदंडे, प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button