पुरस्कार सन्मान

विश्वकर्मा पांचाळ समाजातील सुतार, सोनार, लोहार, तांबट पत्तार यांनी एकसंघ झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नसल्याचे ;परमपूज शिवकथाकार विश्वकर्मीय गुरू अशिषानंद महास्वामीजीं धारूरकर

सोलापूर कालिका देवस्थानच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या गुणीजन व 10 वी 12 वीत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्याचे गुणगौरव

अक्कलकोट, दि.7 :
विश्वकर्मा पांचाळ समाजातील सुतार, सोनार, लोहार, तांबट पत्तार यांनी एकसंघ झाल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नसल्याचे परमपूज शिवकथाकार विश्वकर्मीय गुरू अशिषानंद महास्वामीजीं धारूरकर हे बोलत होते.
ते सोलापूर येथील विश्वकर्मा मय पांचाळ समाज कालीका देवस्थान मसरे गल्ली सोलापूरच्या वतीने गुणीजन गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहाळ्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अशिषानंद महास्वीमींजी धारूरकर बोलत होते.
यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जून सुतार, सोलापूरचे स.पो.नि. अशोक दत्तात्रय सुतार, मुंबईचे स.पो.नि. अशोक तुकाराम सुतार, सांगली तालुका विठाचे नगरसेविक तथा बांधकाम सभापती वैशाली सुतार, पुणे उद्यागपती मल्लप्पा सुतार आदी उपस्थित होते.
याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या गुणीजन व 10 वी 12 वीत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्याचे गुणगौरव व श्री कुलदैवत कालिका देवी यांचे चरित्र अद्य संत भोजलिंगकाका व संत जळोजी मळोजी यांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
अशिषानंदजी महास्वामींजी पुढे बोलताना म्हणाले की, विश्वकर्मा हे पांचाळ समाजाचे कुलदैवत असून त्यांचे पाच पुत्र मनु, माया, त्वष्ठा, शिल्पी, विश्वज्ञ हे एकाच बापाचे पूत्र असताना तु, सुतार, सोनार, लोहार, तांबट, तु पत्तार असे उच्च निचता व भेदभाव करू नका यामुळे समाजाचे प्रगती ऐवजी अधोगती होत आहे. म्हणून सर्व पांचाळ समाज बांधवांनी एकसंघ होणे काळाची गरज आहे. कारण आपले दैवतेचे पूजन सर्व जाती धर्माच्या लोकांनी पूजन करून धन्यता मानत असताना आपण मात्र आपल्यातच उच्च निच बाळगत असल्याचे खंत व्यक्त करत सोलापूर कालिका देवस्थानच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या गुणीजन व 10 वी 12 वीत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्याचे गुणगौरव करून शाबासचकी थाप देऊन वाखाणण्या जोगे असल्याचे सांगून समाज बांधवांनी आपल्या पाल्याला चांगले संस्कार द्या, विद्या विभुषीत करा असे आव्हान महास्वामींजीनी केले.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष शिवानंद सुतार, विरेश मैंदर्गीकर, सुजाता सुतार, प्रमोद सुतार, सुशांत सुतार, महेश सुतार, चंद्रकांत सुतार, उमेश लोहार, ईश्वर मैंदर्गीकर, चंद्रशेखर सुतार, अप्पासाहेब सुतार, गौतम सुतार, सुदर्शन सुतार, बाळासाहेब सुतार, रविंद्र दिक्षित, अंबादास सुतार, गुरूनाथ सुतार आदीसह शेकडो समाजबांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button