पावसाची दांडी मारल्यामुळे खरीप पिक वाया जाण्याच्या मार्गावर ..
शेतकरी हवालदिल ; पिक पावसाअभावी शेतकर्यांच्या हातचा घास जाण्याची वेळ आली आहे.

पावसाची दांडी मारल्यामुळे खरीप पिक वाया जाण्याच्या मार्गावर ..

शेतकरी हवालदिल ; पिक पावसाअभावी शेतकर्यांच्या हातचा घास जाण्याची वेळ आली आहे.

चालु खरीप पिक वाया जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर शिमगा साजरा करण्याची वेळ पावसाअभावी येत असल्याने शेतकर्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान यंदाच्या हंगामात तालुक्यात तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कांदा, मका अशा पिकांची पेरणी तालुक्यातील उत्तर भागात झाली. तसेच तालुक्याच्या वर्तुळात पेरणी झाली. सदरची पेरणी काही शेतकर्यांनी पहिल्या पावसात केली. तर काही शेतकर्यांनी परवा झालेल्या पावसात केली. मात्र सध्या परिस्थिती पाहता पिकांची फुले व कळी, शेंगा अवस्थेत असल्याने सदरचे पिक पावसाअभावी शेतकर्यांच्या हातचा घास जाण्याची वेळ आली आहे. शेतकर्यांसह रासायनिक खते, किटकनाशके, औषधे व बि-बियाणेच्या व्यापार्यांची सुध्दा मोठी अडचण निर्माण झालेली आहे. कृषी भांडार चालक-मालकाकडून रासायनिक खते व बि-बियाणे कंपनीला परत करण्यात आलेली आहे. पाऊस नसल्याने ऊस देखील पाण्याअभावी जळून जात आहे. असलेल्या ऊसाला देखील रोगाचा प्रादुर्भाव जडत आहे. येणार्या रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडई याला देखील फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बँकेची वसुली थांबवा
शेतकरी व कृषी भांडार हे मोठ्या अडचणीत सापडलेले असून विविध बँकाकडून घेतलेल्या कर्जा पोटीच्या रक्कमेकरिता महिना संपताच आपले खाते एनपीए होत आहे, हप्ता भरा अन्यथा कारवाई करु असा बँकाकडून दम भरला जात आहे. सध्याची परिस्थिती पाहता शेतकरी व कृषी भांडार चालक-मालक हे हवालदिल झालेले आहे. बँकाकडून त्रास होवू नये म्हणून याकरिता केंद्र व राज्य सरकारकडून पावले उचलवीत.
अप्पासाहेब पाटील, अध्यक्ष, कृषी भांडार चालक-मालक संघटना, अक्कलकोट
