कोराळ येथे लोककल्याण संस्थेकडून शेतकऱ्यांना विमा पावत्यांचे वाटप
कोराळ व परिसरातील गावामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला

कोराळ येथे लोककल्याण संस्थेकडून शेतकऱ्यांना विमा पावत्यांचे वाटप
मुरूम, ता. उमरगा, ता. ८ (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत ऑनलाइन पिकविमा अर्ज भरलेल्या तब्बल ५२४ पावत्यांचे सोमवारी (ता.७) रोजी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. शेतकरी सध्या अनेक अडचणीचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत लोककल्याण संस्थेकडून मागच्या पाच वर्षापासून मोफत पिकविमा फॉर्म भरून देऊन संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे यांनी कोराळ व परिसरातील गावामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाची दखल घेत नागरिक व शेतकऱ्यांकडून संस्था अध्यक्ष विक्रम दासमे व सचिव रवि दासमे यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. पावती वितरणप्रसंगी संस्थेचे सचिव रवि दासमे, मनोहर सुरवसे, अशोक दासमे, राजेंद्र सुरवसे, संस्था अध्यक्ष विक्रम दासमे, सत्यवान जाधव, किरण दासमे, रामकृष्ण दासमे, विजय पवार, दत्तात्रय भगत, विठ्ठल सुरवसे, मधुकर साळूंके, विक्रम भगत, रमाकांत सुरवसे, बालाजी शिंदे, दगडु जंगाले, महादेव सगर, तानाजी सुरवसे, मधुकर सुरवसे, आप्पाराव लाळे, मारुती चोपडे, तुकाराम कदम, बब्रुवान भगत, दत्तु जंगाले, दत्तात्रय सुरवसे, गोविंद कोळी, तुकाराम सगर, राजाराम कदम, बलभीम सुरवसे, संभाजी सुरवसे आदी गावातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
