गावगाथा

*पत्रकार संरक्षण कायद्याची होणार होळी सोलापूर शहरात विविध संघटनांचे १७ रोजी आंदोलन*

*पत्रकारांवरील वाढत्‍या हल्‍ल्‍याचा निषेध*

*पत्रकार संरक्षण कायद्याची होणार होळी सोलापूर शहरात विविध संघटनांचे १७ रोजी आंदोलन*

HTML img Tag Simply Easy Learning    

*पत्रकारांवरील वाढत्‍या हल्‍ल्‍याचा निषेध*

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर । प्रतिनिधी
पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्‍यानंतरही पत्रकारांवरील हल्‍ले वाढतच आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्‍ले होत असल्‍याने त्‍या निषेधार्थ पत्रकारांच्या विविध संघटना एकत्रित येऊन दि. १७ ऑगस्‍ट रोजी सकाळी 11 वाजता आंदोलन करणार आहेत. जिल्हा परिषद चौकातील पूनमगेट येथे हे आंदोलन होईल. यावेळी पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करुन निदर्शने केली जाणार आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

या आंदोलनात सोलापूर शहरातील विविध पत्रकार संघटनेचे प्रतिनिधी, , इलेट्रॉनिक आणि सोशल मीडियाचे सर्व पत्रकार, छायाचित्रकार सहभागी होणार आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर भ्याड करण्यात आला. या घटनेनंतर मराठी पत्रकार परिषदेची तात्‍काळ बैठक होवून परिषदेचे मुख्य विश्वस्‍त एस.एम.देशमुख यांनी पाचोर्‍यातील घटनेची सविस्तर माहिती देऊन सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्‍यानुसार राज्यातील बहुतांशी पत्रकार संघटना एकत्र आल्‍या 17 ऑगस्ट रोजी राज्यभर निदर्शने करण्याचे ठरले. पत्रकारांचे संरक्षण करण्यास निष्प्रभ ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात 46 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरत आहे. यामुळेच पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

प्रिंट आणि इलेट्रॉनिक माध्यमातील सर्व पत्रकार आणि छायाचित्रकार बंधूनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन विविध संघटना पदाधिकाऱयांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button