दिन विशेष

सर्व धर्मियांनी भारतीय म्हणून जगले तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही.–सदगुरु श्री हवा मल्लिनाथ महाराज 

क्रांतिवीर सांगोळी रायण्णा यांच्या २२६ व्या जयंती निमित्त विविध देश भक्ती कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आला

सर्व धर्मियांनी भारतीय म्हणून जगले तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही.–सदगुरु श्री हवा मल्लिनाथ महाराज 

अक्कलकोट प्रतिनिधी

सर्व धर्मांची समानता, निसर्गाचा नियम आणि संविधान जाणून भारतीय म्हणून जगले तर देशाला कोणताही धोका निर्माण होणार नाही.असा दिव्य संदेश जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराजांनी दिला.
कर्नाटकातील कलबुर्गी – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील आळंद तालुक्यातील लाड चिंचोली जवळ ढोगी बना येथील जय भारत माता देवस्थान येथे ७७ वा स्वातंत्र्य महोत्सव आणि क्रांतिवीर सांगोळी रायण्णा यांच्या २२६ व्या जयंती निमित्त विविध देश भक्ती कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आला. याप्रसंगी महाराजांनी आपल्या दिव्य संदेशात सांगितले की,आपण एका धर्मापुरते, जातीपुरते मर्यादित राहू नये. आजच्या परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने जात, पात पंथ, धर्माचा प्रश्न सोडून प्रथम देशाची भावना आत्मसात आणली पाहिजे. सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र राहून संत महात्म्यांच्या,राष्ट्रीय महापुरुषांचा जयंती उत्सव साजरी करुन सद्भभावनेचा आदर करावा. आणि त्यांना देशाची संपत्ती बनवावी.असे दिव्य संदेश श्री हवा मल्लिनाथ महाराजांनी दिला.


जय भारत माता सेवा समिती नवी दिल्लीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज निरगुडी यांच्या अमृत हस्ते देशामध्ये पहिल्यांदाच लाड चिंचोळी जवळील ढोगी बना येथे जय भारत माता मूर्तींची स्थापना करून देवस्थनाची उभारणी करण्यात आली असून १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी असे वर्षातून दोन वेळा येथे मोठी यात्रा भरते.याप्रसंगी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या देश बांधवांना भगवा, पांढरी व हिरवी अशी तिरंगा शाल देऊन हवा मल्लिनाथ महाराजांनी सत्कार केले.
यानंतर भव्य तिरंगा रॅली द्वारे आळंद चेकपोस्टवर क्रांतिवीर सांगोळी रायण्णा यांच्या २२६ व्या जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला सदगुरु हवा मल्लिनाथ महाराजांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.याप्रसंगी पूज्य श्री करूणेश्वर महाराज दुत्तरगाव,आळंदचे आमदार बी.आर.पाटील, समितीचे राष्ट्रीय वक्ता ऑड वैजनाथ झळकी,कलबुर्गिंचे उद्योगपती शहाजी पाटील सह अनेक देशवासीय हजारो संख्येने उपस्थित होते.
जय भारत माता देवस्थान येथे सर्व भारतीयांना रोज २४ तास मोफत महाप्रसाद दिले जाते.यंदा १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सणानिमित्त हजारो देश बांधवां साठी दूध, पुराण पोळी, खीर,कडक भाकरी, चपाती गरगट्याची भाजी, सांभर,भात अशी पंचामृत महाप्रसादांची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. जय भारत माता, सदगुरु हवा मल्लिनाथ महाराजांची दर्शन आणि महाप्रसाद घेवुन देशभक्तांनी १५ ऑगस्ट या राष्ट्रीय सण जल्लोषात साजरी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button