*महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा-हसन मुश्रीफ*
महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाला दिलेल्या स्वायत्त दर्जामुळे लिंगायत समाजातील पोट जातींसह सरसकट लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी याचा लाभ होणार आहे.

*महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा-हसन मुश्रीफ*
मुंबई — मंत्री हसन मुश्रीफ व माजी मंत्री आ.विनय कोरे यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महामंडळाला मंत्रिमंडळाने महामंडळाला स्वायत्त दर्जा दिला. लिंगायत समाजासाठी स्वतंत्र महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करावी,अशी मागणी पावसाळी अधिवेशनापूर्वी मुंबई येथे लिंगायत महामोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले होते. अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने सरकारकडे मागणी केली होती.त्यानुसार सरकारने महामंडळाची स्थापना केली होती. परंतु; स्वायत्त दर्जा दिला नव्हता. दरम्यान; मंत्री मुश्रीफ व आ. कोरे यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महामंडळाला मंत्रिमंडळाने महामंडळाला स्वायत्त दिला.
यामुळे लिंगायत समाजातील पोट जातींसह समाजाला शेतीसाठी, व्यावसायिक कर्ज, तसेच शैक्षणिक अर्थसाहयाचे सरसकट लाभ मिळणार आहेत. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.याबाबत अधिक माहिती अशी, महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लिंगायत समाजातील पोट जातींना लाभ देण्याचे धोरण तयार झाले होते. परंतु; त्यामुळे बहुसंख्यांने असलेला लिंगायत समाज यापासून वंचित राहणार होता.
पोट जातींसह सरसकट लिंगायत समाजाला लाभ मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक महाविकास महामंडळही स्वायत्त झाले आहे. महात्मा बसवेश्वर महाराज आर्थिक विकास महामंडळाला दिलेल्या स्वायत्त दर्जामुळे लिंगायत समाजातील पोट जातींसह सरसकट लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी याचा लाभ होणार आहे.अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक विजयकुमार हत्तुरे यांनी शासनाचे निर्णय स्वागताहार्य असून संपूर्ण लिंगायत समाजाला याचा फायदा होणार आहे व मंत्री हसन मुश्रीफ साहेब,आ.विनय कोरे व मंत्रिमंडळाचे आभार मानले आहे.