सामाजिक बांधिलकी

वागदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेत एलईडी स्मार्ट टीव्ही लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न

चंद्रकांत अशोक शिंगे यांच्या कडून भेट

वागदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेत एलईडी स्मार्ट टीव्ही लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
वागदरी — येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा वागदरी येथे शाळेतील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण मिळाव यासाठी सॅमसंग कंपनीचे ४३ इंची एलईडी स्मार्ट टीव्ही देणारे वागदरी गावचे सुपुत्र श्री चंद्रकांत अशोक शिंगे यांच्या सहकार्यातून शाळेमध्ये टिव्ही बसवून आज रोजी बहुजन वंचित आघाडी चे अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री चंद्रशेखर मडिखबे साहेब यांच्या शुभहस्ते एलईडी स्मार्ट टीव्ही चे उद्धाटन करण्यात आले. 

HTML img Tag Simply Easy Learning    

                या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वागदरी गावाचे सरपंच श्री श्रीकांत भैरामडगी साहेब हे होते सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, कार्यक्रमांची प्रस्तावना शाळां व्यवस्थापन समितीचे मा उपाध्यक्ष शिवशरणप्पा सुरवसे यांनी करून कार्यक्रमास सुरुवात केली तसेच वागदरी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार हुगे मेजर यांची मुंबई पोलीस दलात भरती झाल्याने त्याचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.                कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून बहुजन वंचित आघाडी चे अक्कलकोट शहर अध्यक्ष विशाल ठोंबरे, उपाध्यक्ष शिवाजी चौगले, तालुका उपाध्यक्ष शाम बनसोडे, संघटक बबन गायकवाड ,परमेश्वर ठोंबरे ,समिती सदस्य गजानन सुरवसे, परमेश्वर यमाजी, शिवलिंग आसुदे ( शालेय व्यवस्थापन समितीची माजी अध्यक्ष) , शिवा इंडे मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक सोनकवडे मॅडम ,कन्नड शाळेचे शिक्षक गोगाव सर सर्व प्रमुख अतिथी यांचे शाळे तर्फे यथोचित असा शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला .उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती मा उपाध्यक्ष शिवशरणप्पा सुरवसे ( अक्कलकोट तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ ) मुख्याध्यापक रेऊरे सर, सहशिक्षिका गिरी मॅडम व फंड मॅडम यांनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button