बेरडवाडी शाळेत आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
जिल्हा परिषद शाळेत राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना पदाधिकारी व शिक्षक वृंद

बेरडवाडी शाळेत आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी
मुरुम, ता. उमरगा, ता. ७ (प्रतिनिधी) : बेरडवाडी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नरवीर आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची गुरुवारी (ता. ७) रोजी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा बेरड समाज राज्याचे उपाध्यक्ष कांतराव मंडले, भुसणी ग्रामपंचायत उपसरपंच दशरथ मंडले, रंजितकुमार भोकले, कल्लाप्पा मंडले, पंडित भोसले, राम मंडले, मुख्याध्यापक अनिल मुडमे, सहशिक्षक युवराज चव्हाण, सुनिल राठोड, रंजना तांदळे, आदींच्या हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी इयत्ता ४ थी ते ७ च्या मुलांनी मनोगते व्यक्त केली. मुख्याध्यापक व शिक्षकांनी उमाजी राजे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांनी मेजवानी म्हणून स्वतः हातानी भेळ बनवून वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनील राठोड तर आभार युवराज चव्हाण यांनी मानले. फोटो ओळ : बेरडवाडी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना पदाधिकारी व शिक्षक वृंद
