
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात राष्ट्रीय गणित दिन साजरा

अक्कलकोट: सौ सुरेखा कल्याणशेट्टी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय गणित दिन विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. सुरुवातीला मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी यांनी गणिताचार्य श्री रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विविध उपक्रमाची सुरुवात करून दिली.
गणित विभाग प्रमुख स्वप्नाली जमदाडे यांनी रामानुजन व आर्यभट्ट या गणित तज्ञांच्या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यानंतर कुमारी प्रज्ञा दसाडे ही विद्यार्थिनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी गणितातील विविध प्रतिकृतींचे व पोस्टर्स यांचे प्रदर्शन मांडले होते. त्यात इयत्ता दहावीतील नैतिक चौगुले, रवी किणगी, समर्थ सुतार, कावेरी गवंडी, कोमल कोरे, आयेशा बंडे, साक्षी घोडके, सिद्धी होटकर, मंगल इंगळे, इयत्ता सहावीतील जैना कारंजे, सेमी विभागातील स्मिता बिराजदार, किरण जोडमोटे, लक्ष्मी टाके, मुक्ता स्वामी, स्नेहा रजपूत या विद्यार्थ्यांनी गणितातील वर्तुळ, भूमापन, सायकल,ऋण व धन संख्यांची बेरीज, वजाबाकी, कोन दशमान परिमाणे, घड्याळ, रोमन संख्या, पूर्णांक अपूर्णांक, विस्तारित रूप, कॅलेंडर, विस्तारित सूत्रे, सूत्रांची मॉडेल, कोनाचे प्रकार, अबॅकस अशा विविध गणिताची मॉडेल्स व पोस्टर्स प्रदर्शनामध्ये मांडलेली होती.
इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी टपाले, कुमारी सोमय्या शेख, सादिया शेख, कार्तिकी गायकवाड या विद्यार्थिनींनी श्री रामानुजन व आर्यभट्ट या शास्त्रज्ञांच्या गणितातील विविध क्लुप्त्या काही मॉडेल्स पोस्टरद्वारे दाखवले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गणित प्रदर्शन दाखवण्यात आले.
याबरोबरच इ 8 वी ची स्नेहा देडे ही गणित सुविचार सांगितली तर इ 10 ची पूजा बंदीछोडे ही गणितावरील प्रश्नमंजुषा सादर केली. इ 10 ची रोहिणी कोटी ही गणितावरील एक कविता सादर केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश शिक्षक रवीकिरण दंतकाळे, दीपक गंगौंडा व सागर मठदेवरू यानी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
