Tadwal : केशव आबाजी इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

तडवळ प्रतिनिधी दि.२७ (ता. अक्कलकोट) महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत केशव आबाजी इंग्लिश मीडियम स्कूल, तडवळ या प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.


कुमारी सानिका शरणबसप्पा शेडजाळे ही विद्यार्थिनी 90.80 टक्के गुण मिळवून प्रशालेत मुलींमध्ये प्रथम, कुमार समर्थ काशिनाथ सरसंबी 88 टक्के गुण मिळवून मुलांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे तर कुमारी वैष्णवी गड्डी 88.80 टक्के गुण मिळवून मुलीत द्वितीय तर कुमार सागर विजापुरे 85.80 टक्के गुण प्राप्त करून प्रशालेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गीतांजली सरदेशमुख, सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.
