शैक्षणिक घडामोडी

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन मोठ्या थाटात संपन्न*

*आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार वितरण व कार्यकारणी निवड.*

*महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन मोठ्या थाटात संपन्न*

HTML img Tag Simply Easy Learning    

*आदर्श शिक्षक व शाळा पुरस्कार वितरण व कार्यकारणी निवड.*

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या उपशाखा -अक्कलकोट तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे मा.आ.कै.शिवाजीराव (आण्णा) पाटील यांच्या प्रेरणेने तालुकास्तरीय खुले अधिवेशन तसेच नुतन कार्यकारिणी, आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, आदर्श अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात शनिवार दिनांक 09/09/2023 रोजी लोकापूरे मंगल कार्यालय आदरणीय आमदार श्री सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षते मोठ्या दिमाखात पार पाडली.प्रमुख पाहुणे म्हणून*
*मा.बाळासाहेब काळे (राज्याध्यक्ष, शिक्षक संघ)*
*मा.अमोलराजे भोसले (विश्वस्त स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट)*
*मा.महेशजी इंगळे (अध्यक्ष वटवृक्ष देवस्थान, अक्कलकोट)*
*या मान्यवर उपस्थित होते.*
*या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी*
मा.वीरभद्र यादवाड (जिल्हाध्यक्ष -शिक्षक संघ, सोलापूर)
सौ.कुदसिया शेख (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, अक्कलकोट)
मा.गुरूसिध्द कोरे (जिल्हाध्यक्ष -न.पा/मनपा शिक्षक संघ)
मा.उत्तमराव जमदाडे (चेअरमन -सो.जि.शिक्षक सोसायटी)
मा.सतीश वाले (कार्यालयीन सरचिटणीस -शिक्षक संघ)
मा.सौ.जयश्री मुनोळी (महिला आघाडी अध्यक्ष)
मा.सौ.अंबुबाई बिराजदार (सरचिटणीस)
मा.सौ.ममता पटेद (उपाध्यक्षा)
मा.सौ.राजश्री सोलापूरे (संचालिका)
मा.परमेश्वर यादवाड (संचालक -स्वामी समर्थ,वळसंग)
मा.काशिनाथ विजापूरे (चेअरमन -तालुका सोसायटी, अक्कलकोट)
मा.शि.म.पाटील (संचालक -जि.स़ो.शिक्षक पतसंस्था)
मा.सिध्दाराम कटगेरी (मा.चेअरमन)
मा.म.न.सवार (सरचिटणीस -द.सो.शिक्षक संघ)
मा.विद्याधर शिवशरण (मागासवर्गीय सेल अध्यक्ष -सोलापूर)
या प्रमुख अतिथीच्या उपस्थित पार पडला.
*या त्रैवार्षिक अधिवेशनात*
*तालुका अध्यक्ष पदी – श्री.बसवराज खिलारी सर*
*सरचिटणीस पदी – श्री.शशिकांत रंगदाळ सर यांची निवड करण्यात आली.*
*तसेच कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, प्रसिद्धी प्रमुख, चार उपाध्यक्ष, 20 केंद्र संघटक म्हणून 20 शिक्षकांची निवड करण्यात आली.*
*या ऐतिहासिक त्रैवार्षिक अधिवेशनात आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, आदर्श अधिकारी पुरस्कार पुढील मान्यवरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला .*
*आदर्श अधिकारी*
श्री.भिमाशंकर बसण्णा वाले (आदर्श विस्ताराधिकारी, अक्कलकोट)
श्री.शिवाजी तुकाराम शिंदे (आदर्श केंद्रप्रमुख, मंगरूळ)
श्री.विजय अशोक पाटील (आदर्श कर्मचारी,पं.स.अक्कलकोट)
*आदर्श शिक्षक*
सौ.स्वाती कडलासकर ,सौ.शाहीन मडकी, श्री.नागेश व्हनशेट्टी, श्री.प्रशांत वागदरीकर,श्रीम.निलिमा जाधव,श्रीम.शशिरेखा सलगर, श्री.दिनकर भारती, श्री.सिध्दाराम हडपद,श्रीम.गायत्री नल्ला, श्री.शिवानंद हुल्ले,श्रीम.पल्लवी मुरशिळे, श्री.बसवराज परतबादी,सौ.लक्ष्मीबाई चिवडशेट्टी,सौ.गंगुबाई बिराजदार, श्री.प्रविण राठोड, श्री.तानाजी चव्हाण,सौ.वंदना कळसगोंडा, श्री.रेवणसिध्द पुजेरी, श्री.भिमाशंकर हसरमणी,सौ.अंबुबाई बंडगर,सौ.दिलशाद कलबुर्गी
*आदर्श शाळा*
जि.प.प्राथमिक कन्नड शाळा,हैद्रा
जि.प.प्राथमिक कन्नड शाळा,वागदरी
जि.प.प्राथमिक मराठी शाळा,म्हैसलगी
जि.प.प्राथमिक मराठी शाळा,दहिटणेवाडी
न.प .उर्दु शाळा नं.1
*या ऐतिहासिक त्रैवार्षिक तालुकास्तरीय खुले अधिवेशनात प्रास्ताविक श्री.योगेश बारसकर यांनी केले. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा.वीरभद्र यादवाड यांनी सर्व नुतन कार्यकारिणी, आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, आदर्श अधिकारी पुरस्कार प्राप्त सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.तसेच शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी मा आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांना विनंती केली.*
*मा.आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी आपल्या भाषणात शिक्षक संघाने आयोजित केलेल्या त्रैवार्षिक अधिवेशन व आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, आदर्श अधिकारी कार्यक्रमाचे कौतुक करून शासन दरबारी शिक्षकांचे सर्व प्रश्न मांडून सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. असे आश्वासन दिले.*
*गटशिक्षणाधिकारी अधिकारी श्रीम.कुदसिया शेख मॅडम यांनी शिक्षक संघाचे कौतुक करताना शिक्षक संघानी योग्य आदर्श शिक्षक, आदर्श शाळा, आदर्श अधिकारी यांची निवड केली आहे.असे गोड कौतुक शिक्षक संघाचे केले.*
*मा.शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब काळे यांनी ऐतिहासिक आणि भव्य दिव्य कार्यक्रम पाहून जिल्हाध्यक्ष वीरभद्र यादवाड व अक्कलकोट तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांची पाठ थोपटली व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना नविन उर्जा देऊन शिक्षक संघाचे जोमाने कार्य करण्याचे आव्हान केले.*
*बहुसंख्येने उपस्थित शिक्षक, बंधु भगिनी मुळे या नेत्रदीप कार्यक्रमाला आगळे वेगळे रूप आले होते.विशेष* *बाब म्हणजे या ऐतिहासिक कार्यक्रमा वेळी* *वरूणराजाने देखील हजेरी लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश माळी सर व श्री.दत्ता सावंत सर यांनी केले.*
*कार्यक्रम यशस्वी नियोजन श्री.पुंडलिक कलखांबकर सर यांनी केले.*
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेष्ठ नेते श्री.अशोक पोमाजी सर , मार्गदर्शक श्री.सुरेश शटगार सर, श्री.पुडंलिक कलखांबकर सर,रेवणसिध्द हत्तुरे, मंजुनाथ भतगुणकी, योगेश बारसकर, सिध्दाराम पुजारी, बसवराज खिलारी,सतिश पाटील, बापुराव चव्हाण,बाळकृष्ण म्हेत्रे सर, व्यंकट धर्मसालेधर्मराज बिराजदार,निजलिंगप्पा बहिरगोंडे, गुरूनाथ नरूणे, बशीर बागवान, तोळाराम पवार,भिमशा चौगुले, नागनाथ म्हमाणे, रमेश कौटगी ,मल्लिनाथ चन्नपटणे , बालाजी हादवे,गणेश माळी, दत्तात्रय सावंत सर,रामू पवार,गजानन मिराशे, बसवराज दोडमणी, सिध्दाराम चौधरी, श्रीशैल दोडमनी,मडिवाळ कट्टीमनी,व्हनप्पा बुळ्ळा,संजय मंगरूळे, सच्चिदानंद आगरखेड, बाबुराव नडगीरे महादेव पाटील, रमेश पवार, विनोद कोळी, अंबादास वाघमारे,नागय्या वस्त्रद, अशोक ढवळगी,मल्लू पाटील, अंबुजा बोरगांवकर,सुलभा लोखंडे,लता कांबळे, संतोषीमाता वाघमारे, राजश्री हलसंगी,कलावती नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.
*बहुसंख्य शिक्षक ,बंधु, भगिनी , कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा अक्कलकोट तालुका शिक्षक संघाचे त्रैवार्षिक तालुकास्तरीय खुले अधिवेशन व आदर्श शाळा, आदर्श शिक्षक, आदर्श अधिकारी पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.*
*कार्यक्रमाचे आभार अक्कलकोट तालुका शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष श्री.पुंडलिक कलखांबकर सर यांनी मानले.*
*शेवटी वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button