गावगाथा

मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेत नँपकीन पासुन बुके बनविण्याची कार्यशाळा संपन्न ; विद्यार्थीनीना नवनिर्मितीचा आनंद

कार्यशाळा

मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेत नँपकीन पासुन बुके बनविण्याची कार्यशाळा संपन्न ; विद्यार्थीनीना नवनिर्मितीचा आनंद
प्रतिनिधी | अक्कलकोट
मुलांना कृती करायाला आवडते. मुले कृतीतुन शिकतात. यातुन स्वलंबनाचे धडे मिळतात व नवनिर्मितीचा आनंद मिळतो असे प्रतिपादन पर्यवेक्षक आर.एस.पडवळकर यांनी केले.
येथील मराठा मंदिर श्री शहाजी प्रशालेत शनिवारी उपक्रमातुन शिक्षण व स्वावलंबन या योजनेअंतर्गत नँपकीन पासुन बुके बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सांस्कृतिक विभाग प्रमुख योगेश कबाडे, सहशिक्षिका ज्योती बगले, माणिक ढेंबरे, यांनी विद्यार्थीनींना नँपकीन पासुन गुलाबाचे फुल बनवुन रंगीत कागदाच्या साहय्याने बुके बनविण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थीनी कडुन प्रत्येकी एक असे जवळ जवळ पन्नास बुके बनवुन प्रशालेच्या सांस्कृतिक विभागाला सादर केले. फुले नाशवंत असतात. सत्कार कार्यक्रमानंतर ते टाकले जातात. त्याऐवजी सोलापूरची ओळख असलेल्या नँपकीन पासुन बुके बनवुन दिल्यास सत्कारमुर्ती ला नँपकीन वापरता येतात. बाजारातुन विकत आणायचे म्हणलास महागडे मिळतात. यामुळे प्रशालेच्या वतीने विद्यार्थीनींना याचे प्रशिक्षण देऊन नँपकीन पासुन बुके बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. शाळेने या कार्यशाळेसाठी लागणारे नँपकीन, कागद, कवर पुरविले. नँपकीन पासुन वेगवेगळ्या प्रकाराचे गुलाब फुल बनविण्यात आले. मग जसे आवश्यक आहे त्या पद्धतीने एक, दोन, तीन नँपकीन वापरून बुके बनविण्यात आले. यावेळी क्रीडाशिक्षक आर.एम.इंगळे, ए.बी.शिंदे यांच्या सह शिक्षक उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button