शैक्षणिक घडामोडी

कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत *केतन लिगाडे* प्रथम

कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी जयंती विशेष

कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत *केतन लिगाडे* प्रथम

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर प्रबोधन मंच,संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त )आणि कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी अप्पासाहेब काडादी जयंती प्रीत्यर्थ महाविद्यालयीन उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा काल संपन्न झाली. राज्यभरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धेतअध्यात्म,धर्म,अर्थव्यवस्था,कला,साहित्य,संगीत यासह समाजातील सर्वच स्तरावरील आपले विषय वैविध्यपूर्ण पद्धतीने मांडले.
निकाल
प्रथम – केतन लिगाडे ( बी एम आय टी ,सोलापूर ), द्वितीय क्रमांक – संकेत पाटील ( शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज ) तृतीय क्रमांक – पर्जन्य अंजुटगी (दयानंद कॉलेज, सोलापूर ) चतुर्थ क्रमांक- सौरभ वाघमारे (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे ) पाचवा क्रमांक- श्रेया माशाळ( संगमेश्वर कॉलेज, सोलापूर) सहावा क्रमांक विभागून – प्रज्ञा श्रीकांत माळकर ( गरवारे कन्या कॉलेज, सांगली ) सहावा क्रमांक विभागून -अनुष्का बिराजदार ( वालचंद कॉलेज, सोलापूर ) ऐश्वर्या सुरडे ( एलबीपी कॉलेज, सोलापूर ) उत्तेजनार्थ – प्राजक्ता सुरवसे ( वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर )
पारितोषिके
प्रथम क्रमांक – २५०१ रुपये
द्वितीय क्रमांक – १५०१रुपये
तृतीय क्रमांक – १००१ रुपये
चौथा क्रमांक – ७५१ रुपये
पाचवा क्रमांक – ५५१ रुपये
सहावा क्रमांक – ५०१ रुपये
उत्तेजनार्थ दोन प्रशस्तिपत्रके
प्रारंभी संगमेश्वर कॉलेजच्या आवारात झालेल्या उदघाटन सत्रात सकाळी कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांना अभिवादन करून यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण केले. दैनिक संचार च्या उपसंपादक प्रशांत जोशी यांनी या सत्राचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर उपस्थित परीक्षक परीक्षक फैय्याज शेख,प्रा.डॉ. शुभदा उपासे, प्रा.एस. एस. उकळे यांचा कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उदघाटक प्रा. केदार काळवणे ( संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग, पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ, सोलापूर ) ,प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई , कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे प्रा. बी. एन. पटणे,दैनिक संचारचे उपसंपादक प्रशांत जोशी ,स्पर्धा समन्वयक प्रा. शिवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत डॉ. काळवणे यांनी कर्मयोगी अप्पासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख उपस्थितांसमोर ठेवला आणि वक्तृत्व स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
स्पर्धा यशस्वितेसाठी प्रा. राजकुमार खिलारे, प्रा. शीला रामपुरे डॉ. मंजू संगेपाग, प्रा.एस बी निंबर्गी,प्रा. संतोष मेटकरी,प्रा. सुहास दहिटणेकर, प्रा. शिवशरण दुलंगे ,रविशंकर कुंभार आदींनी सहकार्य केलं तर तंत्र सहाय्यक म्हणून संतोष फुलारी यांनी सहाय्य केले.डॉ.सुहास पुजारी यांनी शेवटी निकाल घोषित केला. या वक्तृत्व स्पर्धेचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुड्डेवाडी आणि प्रा.तेजश्री तळे यांनी केले. तर आभार प्रा.संगीता म्हमाणे यांनी मानले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button