गावगाथा

१४ वर्षांचं अयशस्वी करिअर,७ वर्ष काहीच काम नाही; तेजस्विनी लोणारीला अशी आली स्वामींची प्रचिती

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी एक स्वामीभक्त आहे, अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिला आयुष्यात श्री स्वामी समर्थांची कशी प्रचिती आली याबाबत भाष्य केले

१४ वर्षांचं अयशस्वी करिअर,७ वर्ष काहीच काम नाही; तेजस्विनी लोणारीला अशी आली स्वामींची प्रचिती

HTML img Tag Simply Easy Learning    

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी एक स्वामीभक्त आहे, अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने तिला आयुष्यात श्री स्वामी समर्थांची कशी प्रचिती आली याबाबत भाष्य केले

HTML img Tag Simply Easy Learning    

अभिनेत्री तेजस्विनी लोणारी बिग बॉस मराठी सीझन ४ या कार्यक्रमातून विशेष लोकप्रिय झाली. गेल्या काही महिन्यांपासून ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम करते आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून ती विशेष चर्चेत आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये असणाऱ्या तेजस्विनीकडे एकेकाळी सलग जवळपास ७ वर्ष काही कामच नव्हतं. अलीकडेच तिने एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं. तिला बिग बॉसमध्ये मिळालेल्या प्रेमाबद्दलही ती बोलली. कारण ती जेव्हा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली तेव्हा प्रेक्षकांनी मोठी नाराजी व्यक्त केली होती. प्रेक्षकांच्या या मिळालेल्या प्रेमाबद्दल ती म्हणाली की तिने एक वेगळं प्रेम अनुभवलं आणि याकरता तिने बिग बॉसचे आभार मानले. शिवाय ती असंही म्हणाली की, बिग बॉसमध्ये काहीतरी चुकीचं होण्याआधीच स्वामींनी थांबवलं. डोकं फुटण्याऐवजी हात मोडला, माझी तिथे वाईट इमेज बनवण्याआधी इमेज चांगली असतानाच त्यांनी मला बाहेर काढलं. तेजस्विनी हात फ्रॅक्चर झाल्यामुळे बिग बॉसमधून घराबाहेर पडली होती.
या मुलाखतीमध्ये तिला स्वामी समर्थांची प्रचिती कशी आली याबाबत भाष्य केले. इसापतीनी एंटरटेन्मेंट या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती बोलत होतो. स्वामींच्या प्रचितीबद्दल बोलताना म्हणाली की तिने छोट्या-मोठ्या गोष्टींमधून स्वामींची प्रचिती अनुभवली आहे. ती म्हणाली की, ‘खरंतर मी गेले दीडवर्ष सलग काम करतेय. त्या आधी मी सात वर्ष काहीच करत नव्हते. तसं बघायला गेलं तर १४ वर्ष मी अयशस्वी करिअर पाहिलं. केदार शिंदेंचे भाऊ मंदार शिंदे यांच्यासोबत मी १६ वर्षांची असताना पहिला सिनेमा ‘नो प्रोब्लेम’ केला होता. २००७-०८ साली मी तेव्हा नुकतीच दहावी झाले होती. अतुल सिधाये यांच्याकडे फोटोशूट करताना त्यांनी मला सुचवलं होतं.’ती पुढे म्हणाली की, ‘पहिल्याचं सिनेमात जितेंद्र जोशीची हिरोइन झालेले. किशोर नमित कपूर अभिनय शाळेत मी अभिनय शिकले. तिथे सांगितलं जायचं की, पहिली संधी चांगली मिळते, पण ती टिकवून ठेवणं खूप कठीण असतं. मला पहिला चित्रपट मस्त मिळाला. बाकी पुढे काय? चित्रपट अजिबात चालत नव्हते, त्यानंतर आलेला ‘दोघांत तिसरा आता सगळं विसरा’ हा चांगला चालला. आजही लोक मला मिस चित्रा म्हणून ओळखतात. पण असं झालं होतं की, एक चित्रपट खूप चालायचा अन् पुढे काहीच मिळायचं नाही.’
मिळत असणाऱ्या अपयशाबद्दल तेजस्विनी पुढे म्हणाली की, ‘हे माझ्याबद्दल खूपदा घडलं. नितीन देसाईंची पद्मिनी खूप चालली, मात्र त्यानंतर काहीच नाही. अनेकदा तर असं झालं की एखाद्या प्रोजेक्टच्या मिटींगला जायचे, तर त्या व्यक्तीचं कोणीतरी जायचं. यावरुन एकदा मला आई म्हणालीदेखील होती की, तू काय लोकांना मुक्ती द्यायला जातेस का? एकंदरित वेळ आली नव्हती.’
तेजस्विनी म्हणाली की ‘देवमाणूस’ मालिका मिळण्याआधी ती बरेच वर्ष कामापासून दूर होती. यावेळी तिने एक रुटीन बनवलं होतं की, मेडिटेशन, सेल्फ कंट्रोल आणि एक वेळ जेवण. या सगळ्याचं आता कुठे फळ मिळतंय असं अभिनेत्री म्हणाली. यावेळी ती म्हणाली की, ‘स्वामींची प्रचिती खूप छोट्या गोष्टींमध्येही आली आहे आणि मोठ्या गोष्टींमध्येही आली. बिग बॉस म्हणा… कारण बिग बॉसनंतर चार सिनेमे, मालिका, इव्हेंट ही काही सोपी गोष्टी नाही. असं म्हटलं जात ना की बिग बॉसमध्ये करिअर संपत आलेले लोक जातात, त्यामुळे मी तशीच होते.’ तिच्या मते छोट्या आणि मोठ्या अशा अनेक गोष्टींमध्ये स्वामींची प्रचिती येते.

HTML img Tag Simply Easy Learning    

विचित्र अनुभव

​स्वामींची प्रचिती खूप छोट्या गोष्टींमध्येही आली​

मुंबईत येताना बिघडली गाडी अन्…
मुंबईत येताना बिघडली गाडी अन्…
तिने स्वामीच्या प्रचितीचा आणखी एक किस्सा सांगितला. तेजस्विनी म्हणाली की, ‘एकदा गावी गेलेले असताना माझी गाडी बिघडली होती आणि मला खूप तातडीने मुंबईला यायचं होतं. मी फक्त स्वामींना म्हटलं होतं की, मला मुंबईपर्यंत पोहोचवा. त्यावेळी एवढी गाडी बिघडलेली असूनही गावाहून मुंबईला कोणत्याही अडचणीशिवाय पोहोचले. स्वामींचा प्रत्यय अशा छोट्या गोष्टींमधूनही येतो आणि मोठ्या गोष्टींमध्येही येतो. तुम्ही फक्त विश्वास ठेवायला हवा.’ अभिनेत्री म्हणाली की ती लहानपणापासून आध्यात्मिक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button