उपक्रमशील शिक्षक विश्वनाथ पांचाळ यांना राष्ट्र स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
प्रसिद्ध कॉमेडी किंग जॉनी रावत आणि मराठी अभिनेत्री नयन कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

उपक्रमशील शिक्षक विश्वनाथ पांचाळ यांना राष्ट्र स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.


मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून कला साधना या सामाजिक संस्थे मार्फत यंदाचा राष्ट्र स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विश्वनाथ गोपाळ पांचाळ, गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला येथील शिक्षक व एनसीसी प्रमुख यांना दिनांक १७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध कॉमेडी किंग जॉनी रावत आणि मराठी अभिनेत्री नयन कदम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गांधी बाल मंदिर हायस्कूल मध्ये गेली ३१ वर्ष कार्यरत असून विविध सहशालेय उपक्रमात भाग घेऊन अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
लोकसंख्या शिक्षण सहशालेय उपक्रमात राज्यस्तरावर उपक्रमाची निवड झाली होती.
एनसीसीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान, साक्षरता अभियान, पर्यावरण रक्षण, तंबाखू मुक्त अभियान, रस्ता सुरक्षा मोहीम, हेल्मेट वाटप, प्लास्टिक बंदी-कापडी पिशव्यांचा वापर, वृक्षारोपण, स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव, माझी माती माझा देश अभियान, युद्ध नौका भेट विविध उपक्रमातून भावी आदर्श सैनिक घडवण्याचा प्रयत्न करून आज अनेक विद्यार्थी सैन्यात भरती झालेले आहेत.
शालेय उपक्रमात विविध चित्रकला स्पर्धा, फलक लेखन, करोना काळातील: शैक्षणिक साहित्य व किराणा वाटप, लसीकरण मोहीम आदी विविध उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा कायमच प्रयत्न असतो..राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने गांघी बाल मंदिर शाळेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि इतर अनेकांनी पांचाळ सरांचे अभिनंदन केले असून पांचाळ सरांचा अभिमान असल्याचे म्हटले आहे.
