प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. राजकुमार खादीवाले विद्यार्थ्यांची तपासणी करताना डॉ. पुरुषोत्तम बारवकर, मुख्याध्यापीका ए. व्ही. जोशी, संगीता देशमुख व अन्य.

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मध्ये आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
मुरूम, ता. उमरगा, ता. १७ (प्रतिनिधी) : येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (ता. १६) रोजी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन डॉ. पुरुषोत्तम बारवकर यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरासाठी उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार खादीवाले उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापीका ए. व्ही. जोशी, सहशिक्षीका संगीता देशमुख, धनराज हळळे, संगमेश्वर लामजणे, विजया वैष्णव, विरेंद्र लोखंडे, पंकज पाताळे, सागर मंडले, जगदीश सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिराप्रसंगी डॉ. खादीवाले यांनी कुष्ठरोगाबदद्ल मार्गदर्शन करताना त्यांनी कुष्ठरोगाबद्दलची कोणती लक्षणे असतात, न खाजणारा चट्टा, बधीर चट्टा, लालसर तेलकट चट्टा अशा कुष्ठरोगाच्या विविध लक्षणाविषयी व त्यावर काय उपचार घ्यावेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी त्यांनी केली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षेकत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. राजकुमार खादीवाले विद्यार्थ्यांची तपासणी करताना डॉ. पुरुषोत्तम बारवकर, मुख्याध्यापीका ए. व्ही. जोशी, संगीता देशमुख व अन्य.
