
शिक्षक सचिन अहिरे आदर्श भारतीय राजदूत व आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

पूनम पाटगावे
नाशिक प्रतिनिधी

नाशिक :- बागलाण तालुक्यातील केरसाने येथील माध्यमिक शिक्षक सचिन अहिरे यांना नुकतेच अखिल भारतीय मानव सेवा हक्क परिषद व महाराष्ट्र न्यूज १८ यांच्या संयुक्त विद्यमाने तर्फे “भारतीय राजदूत पुरस्कार २०२३” ने गौरवण्यात आले. तसेच मी नाशिककर न्यूज यांच्यातर्फे “आदर्श शिक्षक पुरस्कार २०२३” ने सन्मानित करण्यात आले.
शिक्षक श्री सचिन अहिरे यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे श्रेय आई-वडिलांना, गुरुजनांना, आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला तसेच आपल्या कर्मभूमीला मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेला, कॉमेड उदाराम तुळशिराम देवरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय करंजाड शाळेला देऊन सन्मान वाढविला आहे. लहानपणापासूनच आदर्शांचा वसा घेत, खडतर शैक्षणिक प्रवास करत, गावातील आदर्श मुलगा, शाळेतील आदर्श विद्यार्थी, एस.एस.सी. परीक्षेत विद्यालयात प्रथम तसेच एच. एस. सी. परीक्षेत केंद्रात प्रथम येऊन नावलौकिक, तसेच उच्च महाविद्यालयीन शिक्षणात गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळविली. पुढे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत शिक्षक म्हणून नोकरीस असताना विद्यार्थी हितासाठी विविध शैक्षणिक प्रशिक्षणे राज्यस्तरीय व राष्ट्रीय प्रशिक्षणे, विविध शैक्षणिक लेख व संशोधन तसेच विद्यालयात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवित आहेत. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून करीत असलेले संशोधन कार्य विद्यार्थी हितासाठी पोषक ठरत आहे. आणि एक आदर्श शिक्षक म्हणून आपले काम करीत आहेत. एक आदर्श मुलगा आदर्श विद्यार्थी ते आदर्श शिक्षक हा प्रवास खडतर असला तरी गावातील, समाजातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा आहे. या प्रेरणेतून विद्यार्थी निश्चितच आपले नाव उज्वल करतील आपल्या गावाचे नाव उज्वल करतील व समाजासाठी दिशादर्शक ठरतील एवढी अपेक्षा केली आहे.
