सुलेखनकार रत्नकांत विचारे सर राष्ट्र स्तरीय आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित
सुलेखनकार रत्नकांत विचारे सर राष्ट्र स्तरीय आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित

सुलेखनकार रत्नकांत विचारे सर राष्ट्र स्तरीय आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित


गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

सुलेखनकार, उपक्रमशील शिक्षक रत्नकांत विचारे यांनाआदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर २०२३ या शिक्षक दिनाचे औचित्य साधून कला साधना या सामाजिक संस्थेच्या वतीने १७ सप्टेंबर २०२३ रोजी कराडी समाज हॉल, कामोठे. येथे देण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मेडल व मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले. गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला या शाळेत विचारे मागील ३१ वर्ष कार्यरत असून ते विद्यार्थ्यांसाठी अनेक शालेय व सामाजिक उपक्रम राबवत असतात. या अगोदरही त्यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न व कलारत्न पुरस्कार मिळालेले आहेत .सतत आठ वर्ष अनाथ आणि गरीब होतकरू विद्यार्थ्यांची शालेय लोकवर्गणीतून जमा करून भरणे, सतत पाच वर्ष कॅन्सर पीडित लोकांसाठी एनडीए संस्थे मार्फत सेमिनार व समुपदेशन करणे. विद्यार्थ्यांच्या सुंदर हस्ताक्षर, सुलेखन व चित्रकलेसाठी निरनिराळे विद्यार्थी उपक्रम राबवणे, जनजागृती समिती पुस्तकांची मुखपृष्ठ बनविणे. शालेय सुंदर फलक लेखन करणे, वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, कोरोना काळात किराणा वाटप,आदी कामे त्यांनी केली होती.पुरस्कार प्रदान झाल्यानंतर त्यांच्यावर गांधी बाल मंदिर हायस्कूल शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ सर पर्यवेक्षक रवींद्र खोंडे सर, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच समाजातील सर्व थरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.
