दिन विशेष

करजगी येथील महातपस्वी लि.श्री.गुड्डद बसवराज महास्वामीजी यांचा 58 वा पुण्यतिथी महोत्सव शनि. दि. 23 सप्टें. ते सोम. दि. 2 ऑक्टो. या कालावधीत कार्यक्रम

विद्यमान मठाधीश श्री. म. नि.प्र. शिवानंद महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सलग दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक व राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

करजगी येथील महातपस्वी लि.श्री.गुड्डद बसवराज महास्वामीजी यांचा 58 वा पुण्यतिथी महोत्सव शनि. दि. 23 सप्टें. ते सोम. दि. 2 ऑक्टो. या कालावधीत कार्यक्रम संपन्न होत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

विद्यमान मठाधीश श्री. म. नि.प्र. शिवानंद महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली सलग दहा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक व राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
दि. 24 सप्टें. ते 2 ऑक्टो. या कालावधीत रोज सायं. सहा वाजता वेदमूर्ती पंडित मडिवाळय्या शास्त्री जेरटगी यांच्या रसाळ वाणीने श्री. *सिद्धारूढ चरितामृत* पुराण चालू असून संगीताची साथ यशवंत बडगेर व तबलावादन राजशेखर कट्टीसांगवी हे करत आहेत.
शुक्र. दि. 29 रोजी सकाळी दहा वा. देवस्थान ट्रस्ट व दमाणी ब्लड बँक, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी डॉ. अशोक हिप्परगी, पानमंगरूळ,डॉ. राहुल कारिमुंगी, हृदयरोग तज्ञ, सोलापूर व डॉ. अरकेरे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, करजगी इत्यादी उपस्थित राहणार आहेत.
शुक्र. दि. 29 ते सोम. दि. 2 ऑक्टो. रोजी रात्री आठ वा. होणाऱ्या प्रवचन व सत्संग कार्यक्रमात श्री.परमानंद महाराज, सिद्धारूढ मठ,यळसंगी, श्री. गुरुनाथ महाराज, संगदरी, श्री. गुरुशांतलिंग शिवाचार्य, कल्लहिप्परगे,श्री चन्नमल स्वामीजी, तोळणूर, श्री. करीवृषभ देशीकेंद्र शिवयोगीश्वर स्वामीजी, नोणवीनकेरे,श्री.अभिनव शिवलिंग स्वामीजी, मादन हिप्परगा,श्री. गुरुलिंग स्वामीजी मोरटगी, येलगोड, श्री.प्रभूशांत स्वामीजी, हत्तीकणबस, श्री. अभिनव काडसिद्धेश्वर स्वामीजी, नोणविणकेरे,श्री. षड्डभावरहितेश्वर स्वामीजी, हेगडळळी श्री. शिवयोगी शिवाचार्य, नावदगी, पानमंगरूळ, श्री. बसवलिंग स्वामीजी, अक्कलकोट, श्री. रेवणसिद्ध शिवाचार्य,कडणी,श्री. पांडुरंग महाराज, जेऊर व श्री. सोमलिंग महाराज,शिरवळ या विविध मठाधिपतींची उपस्थिती लाभणार आहे सोम. दि. 2 ऑक्टो. पुण्यतिथी दिनी प्रातः पाच वा. श्रींच्या समाधीस महारुद्राभिषेक व सहस्त्र बिलवार्चन होणार असून सकाळी सात वा. महामृत्युंजय होम व सहस्त्र सुहासिनींची पूजा संपन्न होणार आहे. दु. बारा वाजल्यापासून श्रींच्या पालखींची गावातून भव्य मिरवणूक होणार असून रात्री आठ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि महोत्सवाची सांगता होणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमांचा लाभ सदभक्तानी घ्यावा असे श्रीमठ व देवस्थान ट्रस्टच्या वतीने अनिल सरसंबी यांनी केले आहे.🙏🙏

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button