मुरूम येथे ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…. १२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान…..
ईद-ए-मिलाद निमित्त

मुरूम येथे ईद-ए-मिलाद निमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…. १२५ रक्तदात्यांनी केले रक्तदान…..

मुरूम, ता. उमरगा, ता. १ (प्रतिनिधी) : शहरात ईद-ए-मिलाद निमित्त मुस्लिम तरुणांच्या वतीने शनिवारी (ता. ३०) रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १२५ रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मानवी रक्ताला अजूनही पर्याय शोधता आला नाही म्हणून रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, असे समजले जाते. रक्तदानामुळे अनेक फायदे राज्यातील विविध रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये आजही रक्त साठा कमी पडत आहे. रक्ताच्या अनुपलब्धतेमुळे अनेक रुग्णांची हाल होत आहेत. याकरिता मुरूम शहरातील मुस्लिम समाजाचे वतीने ईद-ए-मिलाद निमित्त सामाजिक बांधिलकी जपत बाबशेट्टी कॉम्प्लेक्स येथे सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात शहर व परिसरातील तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला तब्बल १२५ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिराला धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीचे सहकार्य लाभले. यावेळी रक्तपेढीचे अधिकारी दिनकर सुपेकर, एस. ओ. वाघमारे, भारत नागरगोजे, आधिपरिचारिका शुभांगी रणखांब, वाहन चालक पांडू कसपटे आदींनी रक्त संकलन केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी चांद गवंडी, शकील मुरडी, हसन झारेगर, बाबा कुरेशी, राजू मुल्ला, पाशा येणेगुरे, सैपन चौधरी, शाहिद येणेगुरे, हारुण मोगले आदीसह शहरातील तरुणांनी परिश्रम घेतले. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथे ईद-ए-मिलाद निमित्ताने रक्तदाते रक्तदान करताना पदाधिकारी व कार्यकर्ते
