![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231002-WA0077-780x470.jpg)
सोलापूर जिल्हा न्यायालय आवारात ग्रंथालय विभागातर्फे स्वच्छता उपक्रम
———————————————
सोलापूर-राष्ट्रपिता म.गांधी याना आदरांजली अर्पण करण्यासाठी एक ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा ते अकरा या कालावधीत सोलापूर जिल्हा न्यायालयाच्या आवारात सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ आणि कार्यकर्ते व कर्मचारी संघटना यान्च्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन परिसर चकाचक करण्यात आला.यावेळी न्यायालय कर्मचारी,लालसंगी वकील साहेब व त्यान्चे सहकारी ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव,प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार,कुन्डलिक मोरे,ग्रंथालय संघाचे पदाधिकारी,कर्मचारी संघटनेचे सदाशिव बेडगे,प्रा गुणमाला पाटील,अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पंतप्रधानाच्या आवाहनानुसार स्वेच्छेने सर्व जण सहभागी होऊन स्वच्छता मोहीम राबविली .स्वच्छता मोहिमेचे महत्व ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव यान्नी विशद केली.आभार प्रदर्शन प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार यान्नी मानले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)