सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांचेकडून डहाणू येथील वाचनालयासाठी पुस्तक व शैक्षणिक साहित्य सुपूर्द
शैक्षणिक उपक्रम २०२३
सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांचेकडून डहाणू येथील वाचनालयासाठी पुस्तक व शैक्षणिक साहित्य सुपूर्द
सुभाष मुळे
पुणे प्रतिनिधी
सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात वाचकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून प्रत्यक्ष हातात पुस्तक घेऊन वाचणारे दुर्मिळ होत आहेत.अशावेळी रोटरॅक्ट डिस्ट्रिक्ट ३१४१ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मुंबई स्काय सिटी क्लब च्या माध्यमातून डहाणू येथे नव्याने उघडण्यात वाचनालयासाठी व गावातील विद्यार्थ्याना वाचनाची आवड गोडी लागावी यासाठी जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी नुकतीच जवळपास शंभरहून अधिक नवीन पुस्तके, मासिक आणि शैक्षणिक साहित्य या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रणाली भिंगे व प्राजक्ता सरवणकर या कार्यकर्तीना सुपूर्द केली.
गणेश सरांना पुस्तके भेट देण्याचा छंद असून आतापर्यंत त्यांनी २५ वर्षात जवळपास तेरा हजारांहून अधिक पुस्तक, मासिक विविध वाचनालय, संस्था, क्रीडा स्पर्धा, व अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहुण्यांना, खेळाडूंना आणि ते ज्यांना ज्यांना भेटतात त्यांना दिलेली असून अनेकांनी त्यांच्या या छंदाचे अनुकरण करीत पुस्तकं वाटण्यास सुरुवात केली आहे. वाचनामुळे भाषा सुधारते, अनेक गोष्टींचे आकलन होते, ज्ञानात भर पडते, तसेच पुस्तकासारखा सोबती नाही.पुस्तकं आपल्याला दिशा देण्याचं काम करतात. वाचन व लेखन करणे हे आनंद देणारे छंद आहेत असे हिरवे सांगतात. हिरवे सरांनी सामजिक कार्याची जाणीव ठेऊन आतापर्यंत एकूण ३५ वेळा रक्तदान आणि १७ वेळा प्लेटलेट्स डोनेट केलेले आहे. मृत्यू पश्चात देहदान व अवयवदानाचा संकल्प देखील त्यांनी केला आहे. अनेकवेळा शुभ प्रसंगी आपण देत असलेल्या महागड्या गिफ्ट बरोबरच एखाद छानस पुस्तक
देखील नक्कीच भेट देऊ शकतो यासाठी ते आग्रह करतात. हिरवे गुरुजी करीत असलेले कार्य खरंच खूप प्रेरणादायी असून त्यांचा अभिमान असल्याचे अनेकजणांनी सांगितले आहे.