विकासाचा भुकेला आहे. विरोधकांना बिनबुडाचे आरोप करू द्या तुम्हा तालुका वाशियांच्या आशीर्वादाने विकास कामातून उत्तर देत असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी
बासलेगाव ते उडगी जाणाऱ्या सहा किलोमीटर रस्त्याचे लोकार्पण सोहळा उडगे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलत होते.

अक्कलकोट:- (प्रतिनिधी)
मी विकासाचा भुकेला आहे. विरोधकांना बिनबुडाचे आरोप करू द्या तुम्हा तालुका वाशियांच्या आशीर्वादाने विकास कामातून उत्तर देत असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केले.

बासलेगाव ते उडगी जाणाऱ्या सहा किलोमीटर रस्त्याचे लोकार्पण सोहळा उडगे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलत होते.

यावेळी उडगीचे सरपंच ओंकारप्पा हरकुड बसवराज कोळी भाजपा तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड वाहिदपाषा शेख संतोष आळगी नागराज कुंभार जगदीश बिराजदार धोंडाप्पा बनसोडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

बासलेगाव ते उडगीला जाणारी सहा किलोमीटर रस्ता गेल्या पंचवीस वर्षापासून उकडून खड्डामय झालेला होता उडगी ग्रामस्थासह पंचक्रोशीतील नागरिकांना या रस्त्यावरून जाण्या येण्यासाठी नाहक त्रास होत असल्याने या रस्त्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार होत होती मात्र तत्कालीन लोकप्रतिनिधींनी दखल घेतले नव्हते परंतु मी आमदार झाल्यानंतर या रस्त्याची दखल घेऊन बासलेगाव ते उडगीला जाणारी सहा किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी दोन कोटी 48 लाख रुपये मंजूर करून आणले सदरील रस्त्याचे काम पूर्णही झाले असून त्याचे लोकार्पण करताना मला मनस्वी समाधान होत असल्याचे सांगून विरोधकांनी विरोध करत राहावं आपण मात्र तुम्हा तालुका वाशियांच्या आशीर्वादाने विकास कामातून उत्तर देणार असल्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी बोलत होते.

पुढे म्हणाले प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षाचे अवचित्य साधून प्रत्येक गावात देशासाठी बलिदान गेलेल्या वीर सुपुत्रांसाठी 75 हुन अधिक वृक्षांचे रोपवाटिका तयार त्या वीरांना समर्पित करण्याचे संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोडल्यामुळे मेरी माटी मेरा देश ही अभियान देशभर चालू असून हे अभियान प्रत्येक युवकांना प्रेरणा देणारी देशप्रेम जागृत करणारी आहे. मोदीजींनी जनहितार्थ शेकडो योजना अमलात आणले असून यामुळे अल्पकाळात देश विश्वगुरू होण्याचे मार्गावर असल्याने मोदी है तो मुनकीन है हे आता सर्व भारतीयांना कळून चुकलेले आहे आगामी निवडणुकीत आपण सर्वांनी मोदीजींच्या खंबीर नेतृत्वाला साथ द्यावी अशी आव्हान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
याप्रसंगी शिवानंद येळमेली येगप्पा हन्नोरे पिराप्पा कुंभार नसरुद्दीन मुल्ला महादेव धनशेट्टी रामचंद्र मेहत्रे उमेश कोळी काशिनाथ जगजंबगी दिलीप यमगर उमेश पांढरे शिवशंकर स्वामी सिद्धेश्वर कोळी सार्वजनिक बांधकाम विभागाची उपकार्यकारी अभियंता अमोल खमितकर आदीसह पंचक्रोषीतील शेकडो नागरिक उपस्थित होते.
