कै. चन्नबसप्पा खेडगी यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ७५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले..
विशेष म्हणजे महाविद्यालयात गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक कर्तव्याचा भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.

कै. चन्नबसप्पा खेडगी यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ७५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले..

अक्कलकोट दि. ६- अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक उपाध्यक्ष कै. चन्नबसप्पा खेडगी यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त सी. बी. खेडगी चॅरिटेबल ट्रस्ट व सी. बी. खेडगी महाविद्यालय परिवाराच्या वतीने एन्. एस. एस. आणि एन्. सी. सी. विभागाच्या च्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरात
७५ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. विशेष म्हणजे महाविद्यालयात गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक कर्तव्याचा भाग म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते.या

शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव सुभाष धरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी

माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी, संस्थेचे उपाध्यक्षा भारती खेडगी, चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, व्हाइस चेअरमन अशोक हारकूड, संचालक अडव्होकेट अनिल मंगरुळे, संचालिका पवित्रा खेडगी, ज्योती धरणे,प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट, माजी प्राचार्य डॉ. किसन झिपरे,उपप्राचार्य प्रा. बसवराज चडचण, पर्यवेक्षिका वैदेही वैद्य, विरभद्र मोदी, ओमप्रकाश तळेकर, उपस्थित होते.

रक्तदान करणे हे अत्यंत गरजेचे असून रक्त ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही कारखान्यात तयार होत नसते ते मानवाने मानवाला दिले पाहिजे, असे प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोट यांनी सांगितले.

डॉ. हेडगेवार
रक्तपेढीचे प्रमुख डॉ. सुभाष बनसोडे यांनी बोलताना रक्त दिल्याने गरीब गरजू रुग्णांसाठी त्याचा वापर होतो, असे
सांगितले.
या शिबिरास सोलापूरच्या डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सहकार्य लाभले. शिबिरात राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजनासह क्रीडा विभागाचे विद्यार्थ्यांसह माजी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आदिनी स्वेच्छेने रक्तदान केले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी
समन्वयक प्रा. विलास अंधारे, प्रा. निलकंठ धनशेट्टी, डॉ.इफ्तेखार खैरदी, डॉ. गुरुसिध्दय्या स्वामी, प्रा. संध्या इंगळे, प्रा. सिध्दाराम पाटील, प्रा. प्रकाश सुरवसे, शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी परिश्रम घेतले.