मैंदर्गी येथील दिपावली फराळ कार्यक्रम रद्द करुन श्री बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट व एम.एस. युथ फाऊंडेशनच्या वतीने 30 पाण्याच्या टाकी बसवून शहरवासियांचे सोय करुन दिल्याबद्दल महेश शावरी यांच्या कार्याचे कौतुक..
सामाजिक बांधिलकी
मैंदर्गी येथील दिपावली फराळ कार्यक्रम रद्द करुन श्री बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट व एम.एस. युथ फाऊंडेशनच्या वतीने 30 पाण्याच्या टाकी बसवून शहरवासियांचे सोय करुन दिल्याबद्दल महेश शावरी यांच्या कार्याचे कौतुक..
अक्क्लकोट तालुक्यातील मैंदर्गी येथील भीषण पाण्याची टंचाई लक्षात घेवून सालाबादाप्रमाणे घेण्यात येणारी दिपावली फराळ कार्यक्रम रद्द करुन श्री बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट व एम.एस. युथ फाऊंडेशनच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी 30 पाण्याच्या टाकी बसवून शहरवासियांचे सोय करुन दिल्याबद्दल महेश शावरी यांच्या कार्याचे कौतुक व स्वागत होत आहे.*
मैंदर्गी शहरातील विविध महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक व शहरवासियांनी फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश शावरी यांना प्रत्यक्ष भेटून सालाबादाप्रमाणे घेण्यात येणारी दिपावली फराळ कार्यक्रम रद्द करुन शहरातील विविध भागात पाणी टाकीबरोबरच पाण्याचे नियोजन करण्याची मागणी केली असता तात्काळ शावरी यांनी यास प्रतिसाद देत पाणी टाकी बरोबरच पाईपलाईन, नळ व इतर साहित्य उपलब्ध करुन पाणीप्रश्न सोडविले.
पाणीटंचाई निर्माण होत असल्याने त्या अनुषंगाने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना माजी नगरसेवक, समाजसेवक व नेते मंडळी यांनी पाण्याची टंचाई त्वरित मार्गी लावा म्हणून निवेदने देण्यात आली. परंतु पालिका प्रशासनाने याचे गांभीर्य न घेता केवळ चालढकल करीत असल्याचे महेश शावरी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शहरवासियांचे होत असलेल्या त्रासाबद्दल स्वखर्चाने गावातील विविध भागात 30 सींटेक्स टाकी बसवून जेथे मिळेल तेथून पाण्याचे नियोजन करून गावकर्यांची पाणी टंचाई कमी भासू नये म्हणून पाणी टाकीबरोबरच पाण्याची सोय करुन दिल्याने महेश शावरी यांच्या कार्यालचे कौतुक व स्वागत होत आहे.
गावात अनेक नेते पाण्याचं प्रश्न सोडवण्यास अनेक अथक प्रयत्न करून सुध्दा शेवटी कोणतेही बदल घडताना दिसत नव्हते म्हणून शेवटी महेश शावरी यांनी निवेदने किंवा प्रशासनच्या मागे न लागता स्वतः ग्राउंडवर उतरून प्रत्येक गल्लीत भेटी देऊन नागरिकांच्या पाण्याबाबत अडीअडचणी विचारात घेऊन स्व-खर्चाने पाण्याची टाकी, पाइपलाइन, नळ व इतर पाणीपुरवठा साधने आणून गावच्या पाण्याची समस्या दूर करण्यास एम.एस. युथ फाउंडेशनकडून कार्य सुरु आहे. चावडी गल्ली, सिंदगी गल्ली ,कडगंची गल्ली, सुभाष गल्ली, जय भवानी गल्ली येथे पाण्याचे टाकी बसविले आहेत.
पुढे ज्या- ज्या ठिकाणी नागरिकांची पाणी टाकी मागणी असेल तेथे सर्व ठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यास कट्टीबद्ध असल्याचे सांगून आणखीन शहरातील पाणी टाकी हवे असल्याचे संपर्क साधण्याचे आवाहन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश शावरी यांनी केले आहेत.