राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या बसस्थानकाचे भूमीपुजन कार्यक्रम होणार
बसस्थानकाच्या नवीन इमारतीकरिता नुकतचे रु.29 कोटी मंजूर केले आहे. सर्व त्या सोयीनियुक्त असे बसस्थानक असणार आहे.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231010-WA0047-413x470.jpg)
*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या बसस्थानकाचे भूमीपुजनासह आदी कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षाचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गेल्या अनेक वर्षापासून विकासापासून कोसो दूर असणार्या बसस्थानकाच्या नवीन इमारतीकरिता नुकतचे रु.29 कोटी मंजूर केले आहे. सर्व त्या सोयीनियुक्त असे बसस्थानक असणार आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व अन्य मंत्री, पदाधिकारी हे उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमातच विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील नेते मंडळींच्या नजीक असलेले शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
आगामी विविध निवडणुका पाहता या प्रवेशाला महत्त्व प्राप्त झाले असून या कार्यकर्त्यांमध्ये तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या अत्यंत विश्वासूचा समावेश असल्याचे समजले जात आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडून तंटामुक्त मतदारसंघ ठेवण्यात यशस्वी झाले असून या बरोबरच विकास कामांचा धडाका आमदारकीच्या पहिल्या वर्षापासूनच चालुच आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
प्रत्येकांच्या कामाला प्राधान्य देणारे नेतृत्व तालुक्याला लाभले आहे. त्यामुळेच लवकरच भाजपात ‘मेघा प्रवेश’ पहायला मिळणार आहे. प्रवेश करणारे कोण? याबाबत मतदार संघातून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.