अक्कलकोट चे प्रा.पवन हरदास यांना भारत सरकार कडून रसायनशास्त्र संशोधनासाठी पेटंट जाहीर
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक पवन सूर्यकांत हरदास यांना टी.बी. संशोधनासाठी रसायनशास्त्रातील पेटंट जाहीर
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231010-WA0050-413x470.jpg)
अक्कलकोट चे प्रा.पवन हरदास यांना भारत सरकार कडून रसायनशास्त्र संशोधनासाठी पेटंट जाहीर
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट, दि. १०-
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक पवन सूर्यकांत हरदास यांना टी.बी. संशोधनासाठी रसायनशास्त्रातील पेटंट जाहीर झाले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी च्या इतिहासात प्रथम पेटंट प्रा. पवन हरदास यांना जाहीर झालेले पहिले पेटंट ठरले आहे. प्रा. पवन हरदास व त्यांचे संशोधक मार्गदर्शक डॉ. एम. जी. लांडगे व डॉ. बी. व्हि. केंद्र व इतर सहकारी यांच्या सहाय्याने हे पेटंट त्यांना प्राप्त झाले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
कोमोन फ्युजड १,३,४ थायाडायाझोल अँण्ड सिंथेसिस देअर ऑफ या विषयावर हे पेटंट जाहीर झाले आहे. या पेटंटचा फायदा टीबी संक्रमीत रोगांना टीबी पासून कायमची मुक्तता मिळण्यासाठी होईल. तसेच टीबी या रोगामुळे जागतीक पातळीवर मोठ्या प्रमाणात लोक मृत्युमुखी पडत असल्याने, टीबी रुग्णांसाठी हे संशोधन एक आशेचा किरण निर्माण होऊ शकेल.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
टीबी मुक्तीसाठी महत्त्वाचे संशोधन प्रा. पवन हरदास यांनी केल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
प्रा. पवन हरदास यांना पेटंट प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, प्राचार्य डॉ. शिवराय अडवितोट, उपप्राचार्य बसवराज चडचण, पर्यवेक्षिका वैदेही वैद्य, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गानी अभिनंदन केले. भविष्यातील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.