स्वामीनाम हेच सर्वश्रेष्ठ धन – अभिनेत्री प्रतीक्षा जाधव
(अ.कोट,श्रीशैल गवंडी, दि.१७/०९/२०२५)
जीवनामध्ये नामस्मरणाला अनन्यसाधारण महत्व आहे. स्वामीनामाची महती मनन व चिंतन केल्याने कळते.
मला या स्वामींच्या नामचिंतनाने ही महती कळाली आहे. यामुळे स्वामीनाम हेच माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ धन असल्याचे मनोगत
देवमाणूस फेम अभिनेत्री प्रतीक्षा जाधव
यांनी व्यक्त केले. ते येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांचा
श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी
अभिनेत्री प्रतीक्षा जाधव बोलत होत्या. पुढे बोलताना अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांनी श्री स्वामी समर्थ महाराजानी वटवृक्षाखाली साधना केली, तो वटवृक्ष नामस्मरणरूपी सावली आहे. यात आपल्या ऐश्वर्याचा आनंद सामावलेला आहे. हा आनंद आपणाला वटवृक्षाच्या सावलीने व स्वामींच्या दर्शनातून भेटतो. त्यामुळे या प्रेरणेतून आज येथे स्वामींच्या मंदिरात बसून श्री स्वामी नामाचे जप करुन स्वामी नामाचे सर्वश्रेष्ठ धन आपल्या अंतरआत्म्यात जतन करून ठेवले आहे. या पुढील उर्वरित आयुष्यही स्वामींच्या नामस्मरणातच व्यतीत करून जीवन सार्थकी करायचं असल्याचे मनोगतही
अभिनेत्री प्रतीक्षा जाधव यांनी व्यक्त केले. या प्रसंगी प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, व्यंकटेश पुजारी, विश्वस्त महेश गोगी यांच्यासह स्वामीभक्त व देवस्थानचे कर्मचारी, सेवेकरी उपस्थित होते.
फोटो ओळ – अभिनेत्री प्रतीक्षा जाधव
यांचा सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!