घोळसगाव येथील शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान शनी अमावस्या यात्रा महोत्सव निमित्य शुक्रवार दि.१३ पासून विविध धार्मिक, सामाजिक कर्यक्रम आयोजन..
सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज दर्शन सोहळा, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम होणार असून भाविक भक्तांनी सद्गुरूचा दर्शन आणि महाप्रसादचा आवश्य लाभ
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231010-WA0064-447x470.jpg)
घोळसगाव येथील शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान शनी अमावस्या यात्रा महोत्सव निमित्य शुक्रवार दि.१३ पासून विविध धार्मिक, सामाजिक कर्यक्रम आयोजन..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट दि.१० (प्रतिनिधि)
तालुक्यातील घोळसगाव येथील स्वयं जागृत नवसाला पावणारा सर्व धर्मीय श्रद्धास्थान शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान शनी अमावस्या यात्रा महोत्सव निमित्य शुक्रवार दि.१३ पासून विवध धार्मिक, सामाजिक कर्यक्रम आयोजित केले आहेत.
कलियुग अवतारी ब्रम्हांड नायक सद्गुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांचे दिव्य सानिध्यात शनी अमावास्या यात्रा म्होत्सव कार्यक्रम नेहमी भक्ती भावनेने मोठ्या उत्साहात साजरी केल्या जातात. सद्गुरु हवा मल्लिनाथ महाराजानी भक्तांना संसाराच्या व्यापातून थोडाकाळ विश्रांती मिळावा आणि भक्ताने आपले जिवन सार्थक करून भक्ती मार्गाकडे वळावे, यासाठी आंध्रा,कर्नाटका, महाराष्ट्रा, अशा अनेक राज्यासह संपूर्ण देशभरात सुमारे सहा हजारोहून अधिक शिवलिंगाची स्थापना केले आहेत.त्या पैकी घोळसगाव येथील शनेश्वर देवस्थान हे नवसाला पावणारा स्वयं जागृत सर्व धर्मीय श्रद्धास्थान देवस्थान आहे.
प्रत्येक शनी अमावस्या यात्रेस तुळजापूर, उमरगा, आंळद व अक्कलकोट तालुक्यातील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.यामुळे यंदा यात्रा कमिटीचे वतीने शनी अमावास्या यात्रेची जयत्त तयारी करण्यात आले आहेत. शुक्रवारी दि. १३ ऑक्टोबर रोजी दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून रात्रभर भजन,भारुड,गी गी पदा आदी भरगच्च धार्मिक कार्यक्रम आयोजित केलेल्या आहेत. दि.१४ रोजी शनिवारी पहाटे श्री चे महापूजा, म्हारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होमहवन इत्यादी कार्यक्रम होणार असून सकाळी सात वाजता घोळसगाव ग्राम प्रदिक्षण करीत श्रीचे भव्य पालखी मिरवणूक विविध वाद्य समवेत श्री शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान पर्यत निघणार आहे. यानंतर सदगुरु श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज दर्शन सोहळा, महाप्रसाद इत्यादी कार्यक्रम होणार असून भाविक भक्तांनी सद्गुरूचा दर्शन आणि महाप्रसादचा आवश्य लाभ घ्यावी असे आवाहन एका पत्रकाद्वारे यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)