अडचणीतील शेतकऱ्यांना एकरी ५० हजार द्या-आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे सोलर कंपनीस आवाहन..
चपळगाव येथील ज्युनिपर सोलर प्लॅंटचे लोकार्पण
=====================
निसर्गाच्या लहरीपणामुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत.परंतु सोलर कंपनीस शेती भाडेतत्त्वावर दिलेल्या अडचणीतील शेतकऱ्यांना एकरी वार्षिक भाडे ५० हजार देण्याची मागणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली आहे.
चपळगाव ता.अक्कलकोट येथील ८०० एकर शिवारात उभारलेल्या १५० मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता असलेल्या ज्युनिपर सोलर प्लॅंटचे लोकार्पण आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पार पडले.यावेळी त्यांनी ही मागणी केली.यावेळी व्यासपीठावर कंपनीचे लॅंड मॅनेजर सर्वजीतसिंग, डेप्युटी मॅनेजर चेतन जाधव, प्रोजेक्ट हेड दिपक कटियाल,शैलेंद्र सिंग,विजय तिवारी,अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अप्पासाहेब पाटील,सरपंच वर्षा भंडारकवठे,हन्नुरचे उपसरपंच सागर कल्याणशेट्टी,सरपंच प्रदीप पाटील,
माजी सरपंच उमेश पाटील,डॉ.काशिनाथ उटगे, सिध्दाराम भंडारकवठे,अभिजीत पाटील,सी.ए.ओंकारेश्वर उटगे, मल्लिनाथ सोनार,राजा कोळी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
पुढे बोलताना कल्याणशेट्टी म्हणाले की,सौर ऊर्जेमुळे देशाच्या पर्यावरणाला पुरक चालना मिळणार आहे.देशहित लक्षात घेऊन चपळगाव भागातील हजारो शेतकऱ्यांनी शेती भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत.यामुळे वाढीव भाडे तसेच भागातील जास्तीत जास्त स्थानिक तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळावा,ही अपेक्षा आहे.
चौकट..
आणखी १०० मेगावॉटचा प्रकल्प..
दरम्यान चपळगाव भागात विविध संस्थांनी सोलर प्लॅंटचे जाळे निर्माण केले आहे.हजारो एकरची शेतजमीन स्थानिकांनी भाडेतत्त्वावर दिली आहे.ज्युनिपरची आणखी १०० मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!